spot_img
ब्रेकिंगपुढचे ६ दिवस सतर्क राहा, मुसळधार पावसाचा अलर्ट! वाचा हवामान खात्याची महत्वाची...

पुढचे ६ दिवस सतर्क राहा, मुसळधार पावसाचा अलर्ट! वाचा हवामान खात्याची महत्वाची अपडेट

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू असतानाही, पावसानं जोर कायम ठेवला आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रासह देशातील १३ राज्यांमध्ये पुढील सहा दिवसांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. वादळी वाऱ्यांसह पाऊस होणार असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात पावसानं मोठं थैमान घातलं आहे. अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचं मोठं नुकसान झालं असून, घरं उध्वस्त झाल्याने अनेक कुटुंबं उघड्यावर आली आहेत. पाण्यात बुडालेल्या शेतांमध्ये उभं राहून शेतकरी अश्रू ढाळताना दिसत आहेत. शासनाकडून मदतीची मागणी जोर धरत आहे.

पश्चिम बंगालमधील कोलकातामध्येही मुसळधार पावसानं शहरात पाणी साचवून वाहतूक व्यवस्था विस्कळीत केली आहे. हवामान खात्याने येथे देखील पुढील काही दिवसांसाठी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. भारतीय हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, पुढील सहा दिवसांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, छत्तीसगड, विदर्भ, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, नागालँड, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, कर्नाटक आणि रायलसीमा या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्र: २६ ते २९ सप्टेंबर – कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, गोवा येथे अतिमुसळधार पाऊस
गुजरात: २७ ते २९ सप्टेंबर
ओडिशा, विदर्भ, छत्तीसगड: २४ ते २७ सप्टेंबर
बिहार: २४ सप्टेंबर
झारखंड, पश्चिम बंगाल: २४-२५ सप्टेंबर
ईशान्य भारत (आसाम, मेघालय, नागालँड इत्यादी): २४ ते २९ सप्टेंबर
दक्षिण भारत (आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, केरळ, कर्नाटक, रायलसीमा): २४ ते २८ सप्टेंबर

वादळी वाऱ्यांचा इशारा:
पूर्व आणि मध्य भारतात ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. किनारपट्टीच्या भागांमध्ये वाऱ्यांचा जोर अधिक असण्याची शक्यता असून, मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या सूचना
नदी-नाल्यांच्या किनारी राहणाऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी हलाव
शेतीचं नुकसान टाळण्यासाठी पूर्वतयारी ठेवा
विजेच्या तारांपासून दूर राहा
आपत्कालीन सेवा क्रमांक जवळ ठेवा

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जैन मंदिर: काळे यांचे पुण्यात धरणे आंदोलन; ताबा न सोडल्यास प्राणांतिक उपोषण करणार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगरमध्ये श्री ऋषभ संभव जीन जैन श्वेतांबर संघ (जैन मंदिर) ट्रस्टचा...

बदनामी केली..; किरण काळे यांच्यावर कारवाई करा; पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांना कोणी दिले निवेदन

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- श्री ऋषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघाच्या कापड बाजार अहिल्यानगरच्या...

आघाडी, युतीचे चित्र धुसर…; स्थानिक आघाड्यांना प्राधान्य

नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी राजकारण तापले | वरिष्ठांकडून आदेश मिळेना अहिल्यानगर | नगर सहयाद्री:- अहिल्यानगर...

बोगस दस्त नोंदवून फसवणूक प्रकरण; अंजुम शेख, डावखर, इंगळेंसह सात जणांविरुध्द गुन्हा दाखल

श्रीरामपूर | नगर सह्याद्री वारसा हक्कातील जमिनीच्या वादातून श्रीरामपुरात कोट्यवधी रुपयांचा बोगस दस्त नोंदवून, फसवणूक...