spot_img
महाराष्ट्र“बटेंगे तो कटेंगे”वरून महायुतीला तडे? फडणवीसांचं पवारांबाबत मोठं विधान…

“बटेंगे तो कटेंगे”वरून महायुतीला तडे? फडणवीसांचं पवारांबाबत मोठं विधान…

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडी शिगेला पोहोचल्या आहेत. यासोबतच योगी आदित्यनाथ यांचे ‘बंटेंगे तो कटेंगे’ हे विधानही राज्याच्या राजकारणात चर्चेचे कारण बनले आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या ‘बंटेंगे तो कटेंगे’ या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “अजित पवार अनेक दशकांपासून धर्मनिरपेक्ष आणि हिंदूविरोधी विचारसरणी घेऊन जगले आहेत. जे स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवतात त्यांच्यात खरी धर्मनिरपेक्षता नाही. ज्यांच्यासाठी हिंदुत्वाला विरोध करणे म्हणजे धर्मनिरपेक्षता आहे.”असे म्हणत त्यांनी टीका केली आहे.

अजित पवारांचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुद्दयांवर आपली प्रतिक्रिया दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या राज्यात ‘बंटेंगे तो कटेंगे’ हा फॉर्म्युला चालणार नाही असे ठणकावून सांगितले होते. त्यांच्या या प्रतिक्रियेवर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी “जनतेचा मूड समजायला त्यांना थोडा वेळ लागेल. या लोकांना एकतर जनभावना समजू शकली नाही किंवा या विधानाचा अर्थ समजू शकला नाही किंवा बोलतांना काहीतरी वेगळं बोलायचं असेल.” असे म्हणत पवारांना खडेबोल सुनावले.

दरम्यान ,’बटेंगे तो कटेंगे’ला आम्ही सगळ्यांनी विरोध केला आहे. भाजपमध्ये पंकजा मुंडे, महाजन यांनीही ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध केल्याचे माझ्या कानावर आले. एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येतात आणि ‘बटेंगे तो कटेंगे’बोलतात. आम्ही लगेच त्याला विरोध केला. आम्ही सांगितले की, हा उत्तर प्रदेश नाही. हे उत्तरेत चालत असेल. पण आमच्या महाराष्ट्रात शिव-शाहू-आंबेडकरांची विचारधारा चालते. मी जेव्हापासून राजकारणात आलोय तेव्हापासून पाहतोय महाराष्ट्र दुसरी कोणतीही विचारधारा स्वीकारत नाही, असे अजित पवार यांनी सांगितले. त्यांच्या याच वाक्याचा समाचार देवेंद्र फडणवीसांनी घेतला आहे.

‘महाराष्ट्रातील ओबीसी समाजात फूट पाडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे’ या पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर फडणवीस म्हणाले, “राहुल गांधी यांनी अमेरिकेत हे संकेत दिले आहेत. त्यांनी राज्यघटना आणि आरक्षणावर अमेरिकेत केलेल्या वक्तव्यावरून त्यांची मानसिकता दिसून येते. ते लोकांना जातींमध्ये विभागण्याचा प्रयत्न करत आहेत, महाराष्ट्रात 350 जाती मिळून ओबीसी गट बनतात, हे पंतप्रधान मोदींनी बरोबर सांगितले आहे. ओबीसींचे कल्याण व्हावे, असा दबावगट आहे.

ते पुढे म्हणाले की, 350 जाती वेगळ्या झाल्या तर हा समूह राहणार नाही आणि त्यांचा दबाव संपेल. ज्या पद्धतीने ‘भारत जोडो’ तयार झाला आहे, तो अराजकवाद्यांचा समुदाय आहे. ते ‘एकत्रित भारत’ नाहीत, त्यांना भारताला समाजात विभागायचे आहे आणि नंतर भारताचे तुकडे करायचे आहेत.

उलेमा बोर्डाच्या पत्राच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महा विकास आघाडीने मुस्लिम उलेमांचे पाय चाटायला सुरुवात केली आहे. आता उलेमा परिषदेने त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे, त्यांनी 17 मागण्या मांडल्या होत्या आणि एमव्हीएने औपचारिक पत्र दिले आहे. त्या 17 मागण्यांना माझा आक्षेप नाही, जर कोणी ही मागणी मान्य केली. 2012 ते 2024 या काळात महाराष्ट्रात झालेल्या दंगलीत मुस्लीम समाजाच्या लोकांवर गुन्हे दाखल झाले हे कसले राजकारण आहे?

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विजयराव, तुम्ही त्यावेळी काय करत होतात?; राज्याचं काय झालं यापेक्षा पारनेरचं काय झालं आणि कोणामुळे झाले हे बोला!

औटींच्या विचाराचा मुख्यमंत्री असताना त्यांचे समर्थक विनाकारण पोलिस ठाण्यात डांबले जात होते! / पाठीशी...

नगरमध्ये मोठी रोकड पकडली; उमेदवाराचा मुलगा पकडला

नागवडें पैशांसह पकडला! / दोन लाखाची रोकड सापडली | कायनेटीक चौकात अलिशान वाहनासह दिग्वीजय...

पोलिसांत तक्रार दिली अन पुढे भलतचं घडलं

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - पोलिसांत फिर्याद दिल्याच्या रागातून बहिण-भावाला लोेखंडी गज, लाकडी दांडक्याने मारहाण...

धक्कादायक! पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने उचलले टोकाचे पाऊल, घडले असे…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने अतिप्रमाणात औषधाचे सेवन (वेगवेगळ्या प्रकारच्या 10...