spot_img
ब्रेकिंगबापरे! दहावीचा पेपर फुटला; उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना वाटल्या

बापरे! दहावीचा पेपर फुटला; उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना वाटल्या

spot_img

जालना / नगर सह्याद्री –
दहावी बोर्डाची परीक्षा आजपासूनच सुरू झाली आणि पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला. दहावीच्या परीक्षेला पेपरफुटीचं ग्रहण लागलं. दहावीचा पहिलाच मराठी विषयाचा पेपर फुटला. जालन्यातील बदनापूर शहरात दहावीचा मराठीचा पेपर फुटला असल्याची माहिती समोर आली आहे.

दहावीच्या मराठी पेपरच्या प्रश्नपत्रिकांवर उत्तरं असलेल्या प्रती विद्यार्थ्यांना वाटण्यात आल्या. परीक्षा केंद्राबाहेरच्याच झेरॉक्स सेंटरमधून उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून त्या विद्यार्थ्यांना पुरवल्या गेल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यात दहावीचा मराठीचा पेपर फुटला आहे. पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत हा पेपर फुटला आहे. जालन्यातील बदनापुरात हा पेपरफुटीचा प्रकार घडला आहे. परिक्षा केंद्राच्या बाहेर शहरातील झेरॉक्स सेंटरमधून उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर उघड झालाय.

संपूर्ण राज्यात दहावीच्या बोर्डाती परीक्षा सुरू झाली आहे. वर्षभरापासून या परीक्षेसाठी विद्यार्थी तयारी करत होते. शुक्रवारी दहावीचा मराठीचा पेपर होता. परिक्षा सुरू असतानाच जालन्यातील बदनापूर शहरात एक धक्कादायक प्रकार घडला. जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरात दहावीचा मराठीचा पेपर फुटला आहे. उत्तरांसहीत प्रश्नपत्रिकांच्या झेरॉक्स अवघ्या २० रुपयांत विद्यार्थ्यांना विकल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर शिक्षण विभाग खडबडून जागं झालं असून, या प्रकाराची माहिती घेतली जात असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सामान्यांचा आधारवड: आमदार अरुणकाका जगताप

अहिल्यानगर-  अरुणकाका आमदार अरुणकाका म्हणजे सामान्य जनतेचा आधारवड. गरिबांवरील अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा, गरीब आणि...

हवामान खात्याचा इशारा आला! नगर जिल्ह्याला ‘इतक्या’ दिवसाचा यलो अलर्ट

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा अजूनही कायम असून, हवामान विभागाने पुढील...

निष्ठावंतांचं केडर जपणारे काका पुन्हा होणे नाही!

काका म्हणाले होते, ‌‘जनतेचे आशीर्वाद अन्‌‍ प्रेम मला मिळाले, सचिन आणि संग्रामला माझ्या दुप्पट...

भारतीय सैन्याने पाकिस्तानचा बुरखा फाडला; वाचा, स्पेशल रिपोर्ट

कर्नल सोफिया कुरेशी | पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी...