spot_img
अहमदनगर'प्रहार'च्या श्रीगोंदा शहराध्यक्षपदी बनसोडे, तालुका उपाध्यक्षपदी आढाव व भैलुमे

‘प्रहार’च्या श्रीगोंदा शहराध्यक्षपदी बनसोडे, तालुका उपाध्यक्षपदी आढाव व भैलुमे

spot_img

आप्पा चव्हाण / नगर सह्याद्री : प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चू कडू व जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी, नाना पारदे तालुका अध्यक्ष नगर यांच्या कार्याला प्रेरित होऊन श्रीगोंदा येथील युवकांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला.  यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष सुरेश सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी कृष्णा खामकर. प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीगोंदा शहराध्यक्षपदी माधव बनसोडे तर श्रीगोंदा तालुका उपाध्यक्षपदी संदीप सुभाष आढाव व ज्ञानदेव भैलुमे, गुरु गायकवाड तालुका अध्यक्ष युवक, अमोल कांबळे तालुका उपाध्यक्ष युवक आदींची निवड करण्यात आली. गुरुवार दिनांक २८ मार्च २०२४ रोजी सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा येथे झालेल्या आढावा बैठकीत नियुक्ती करण्यात आली.

प्रहार जनशक्ती पक्ष सर्वच राजकीय पक्षापेक्षा आगळे वेगळे काम करत असून प्रहार १०% राजकारण व ९०% समाजकारण करत आहे. असंख्यजन प्रहार पक्षात सामील होत आहेत असे सुरेश सुपेकर यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी उपस्थित विजू भंडारी संघटक अध्यक्ष, अंकुश शिंदे, अमोल झेंडे, दत्ता वाळके, जयदीप मगर, प्रिया काळे महिला तालुकाध्यक्ष आदी उपस्थित होते. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना; आरतीनंतर नेमकं काय घडलं?

Bageshwar Dham: मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात असलेल्या बागेश्वर धाम याठिकाणी एक मोठी...

तारण ठेवलेले सोने हेल्परने चोरले!, संधी मिळेल तेव्हा टाकायचा डाव..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री ग्राहकांनी तारण ठेवलेले लाखोंचे सोने हेल्परनेच चोरून नेल्याची धक्कादायक घटना...

पोटची मुलगी गेली, भावाची मुलगी मारली; पारनेरमध्ये चुलत्याकडून पुतणीचा खून!

पारनेर । नगर सहयाद्री :- जुन्या रागातून चुलत्याकडून १६ वर्षीय मुलीचा डोयात दगड घालून...

औरंगजेबाविषयी गौरवोद्गार; निघोजमध्ये तणाव; नेमकं काय घडलं?

निघोज । नगर सहयाद्री:- पाच महिन्यापूर्वी येथील एका कुटुंबातील १६ वर्षीय युवकाने औरंगजेबाविषयी गौरवोद्गार...