श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंप्री शिवारातील हॉटेल न्यू प्रशांतमध्ये वास्तव्यास असलेल्या चार बांगलादेशी घुसखोर माहिलांना न्यायालयात हजर केले असता त्यांना सोमवारपर्यंत (दि.10) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपासात या घुसखोर महिला बनपिंप्रीमधील हॉटेलमध्ये कशासाठी आल्या होत्या आणि इतक्या ग्रामीण भागात त्यांना पोहोच करणारे मध्यस्थ कोण आहेत हे स्पष्ट होईल.
श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंप्री येथील न्यू प्रशांत हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या चार बांगलादेशी घुसखोर महिलांना नाशिक येथील दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली. मुरसनिला अख्तर सफिउर सिकदर (वय 20, मुळ रा. पकोरीया, खासीयल, नुरेल, उपजिल्हा खलिया, बांग्लादेश, बदलेले नाव- जुई जियारेल मंडल), रोमाना अख्तर रुमी (वय 20, मुळ रा. हिदीया, वॉर्ड नं 06, अभय नगर, जैसोर, खुलना, बांग्लादेश, बदलेले नाव – मिता आकाश शिंदे), सानिया रॉबीउल इस्लाम खान (वय 20, मुळ रा. बांग्लादेश, (पुर्ण पत्ता सांगता येत नाही) बदलेले नाव – मिम मंडल), सानिफा अबेद अली खान (वय 20, मुळ रा. बांग्लादेश, (पूर्ण पत्ता सांगता येत नाही) बदलेले नाव – सानिफा जाहिद मंडल) अशी न्यू प्रशांत हॉटेल (अहिल्यानगर सोलापूर रोड, ता.श्रीगोंदा) येथून अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी घुसखोर महिलांची नावे आहेत.