अहमदनगर । नगर सहयाद्री:-
ग्राहकांचा विश्वास संपादन करुन विविध गुणवैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल्या ह्युंदाई कंपनीच्या विविध वाहनांच्या मॉडेल्सवर,नगर-पुणे रोड येथील इलाक्षी ह्युंदाई शोरुमच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आकर्षक ऑफर जाहीर करण्यात आली आहे. ह्युंदाईच्या विविध कारच्या मॉडेल्सवर 45 हजार पासून ते 85 हजार पर्यंत सूट दिली जाणार असल्याची माहिती शोरुमचे महाव्यवस्थापक राजू बेजगमवार यांनी दिली.
ग्राहकांना सेवा पश्चात विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या इलाक्षी ह्युंदाई शोरुमच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सव, दिवाळी व पाडवा सणाच्या पाश्वभूमीवर आकर्षक सुट देण्यात येते. या गणेशोत्सवात ऑरा, निऑस, एक्सटर वेन्यू, अल्कजार या कार मॉडेल्सवर अनुक्रमे 43, 45, 48 व 85 हजार पर्यंत सुट जाहीर करण्यात आली आहे. सदरील गाड्या पेट्रोल, डिजेल व सीएनजी आणि आकर्षक कलर्स मध्ये उपलब्ध आहेत.
ह्युंदाई कंपनीने ग्राहकांच्या मनात असणाऱ्या वेगवेगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याकरिता दर्जेदार कार उत्पादने बाजारात आनले आहेत. कमी किंमतीत उच्च दर्जाचे वाहन ग्राहकांना ह्युंदाईच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे. मजबूत आणि संपूर्ण श्रेणीतील विविध गुणवैशिष्ट्येचा समावेश असलेल्या कारच्या श्रेणीला ग्राहकांची पसंती मिळत आहे.
सदर वाहनांच्या मॉडेल्सवर ह्युंदाईच्या आकर्षक सवलतीचा लाभ इलाक्षी हयुंदाई अहमदनगर, ह्युंदाई प्रॉमिस मनमाड रोड, नेवासा फाटा शोरूम, महा एक्सचेंज व लोन मेला श्रीगोंदा येथे भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सणासुदीच्या काळात ग्राहकांना जुनी गाडी एक्सचेंज करण्याची सुविधा शोरूम मध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी 7745010006, 7745009922, 9595569543 व 9112215755 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.