spot_img
ब्रेकिंगपीओपी गणेशमूर्तींवर बंदी; मुंबई हायकोर्टाने दिले संकेत

पीओपी गणेशमूर्तींवर बंदी; मुंबई हायकोर्टाने दिले संकेत

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) २०२० पासून प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या गणेशमूर्ती बनवण्यास बंदी घातली असतानाही याची पूर्ण अंमलबजावणी झालेली नाही. मुंबई हायकोर्टाने याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने यावर्षीपासून पीओपी मूर्तींवर बंदी लागू करण्याचे संकेत दिले आहेत.

मुख्य न्यायमूर्ती उपाध्याय आणि न्यायमूर्ती बोरकर यांनी यावर्षी बंदी लागू करण्याच्या संकेतांसोबतच दुपारी २.३० वाजता पुन्हा सुनावणी ठेवली आहे. त्याआधी महापालिकांनी अंमलबजावणीच्या संबंधित मुद्द्यांवर चर्चा करावी लागणार आहे. मुंबई महापालिकेच्या वकिलांनी सांगितले की, सीपीसीबीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन बंधनकारक नाही आणि कोणाला शिक्षा होईल, असे वैधानिक स्वरूप त्याला नाही. दुसरीकडे, ठाणे महापालिकेच्या वकिलांनी या वर्षी बंदी लागू केल्यास मोठे नुकसान होईल असा दावा केला आहे.

महापालिकांना राज्य सरकारने निर्देश दिले असून, पर्यावरण व जलस्त्रोतांच्या रक्षणासाठी कठोर उपायांची आवश्यकता आहे, असे हायकोर्टाने सांगितले आहे. यावेळी न्यायालयाने पीओपी मूर्तींबाबतच्या बंदीच्या अंमलबजावणीसंबंधी अन्य राज्यांतील हायकोर्टांच्या आदेशांचीही दखल घेतली. सीपीसीबीने १२ मे २०२० रोजी पीओपी मूर्तींवर पूर्ण बंदी घालण्याचे निर्देश जारी केले होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महानगरपालिकेची कारवाई; पाच घर सील, दोघांचे नळ कनेक्शन तोडले

थकबाकीदारांनी शास्तीमाफीचा लाभ घेऊन तत्काळ कर भरावा व कारवाई टाळावी; आयुक्त यशवंत डांगे अहिल्यानगर ।...

संग्राम जगताप : ज्वलंत हिंदुत्वाचा भगवा अंगार

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अल्पसंख्याक समाजाच्या गठ्ठा मतांना फाट्यावर मारणारा अजित पवार यांच्या गटातील राज्यातील एकमेव...

आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यात ‘तो’ पॅटर्न; मंत्री दादा भुसे यांनी केले जाहीर

मुंबई | नगर सह्याद्री राज्यतील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडे (सीबीएसई) पालकांचा वाढत कल पाहून राज्य...

सत्तांतरामुळे बीडची पुनरावृत्ती नगरमध्ये टळली’; डॉ. सुजय विखे पाटील यांचा टोला

अहिल्यानगर | नगर सह्याद्री दुर्दैवाने, मी राजकारणातील अभिनयगिरीत अपयशी ठरलो, पण प्रामाणिकपणे विकासकामे केली आणि...