spot_img
अहमदनगर'कष्टाचे दाम मिळविण्यासाठी बळीराजाचा संघर्ष'

‘कष्टाचे दाम मिळविण्यासाठी बळीराजाचा संघर्ष’

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
श्रीगोंदा तालुक्यातील बाजारात भाज्यांचे दर कमी झाल्याने सर्वसामान्य समाधान व्यक्त करत आहेत. परंतु शेतकरी मात्र चिंतेत सापडला आहे. काही दिवसांपूव भाज्यांचे दर कडाडले होते. परंतु आता बाजारात भाज्यांची आवक वाढल्याने भाज्यांचे दर कमी झाले आहेत. बदलते हवामानामुळे आधीच बळीराजा संकटात सापडला आहे. त्यात आता भाज्यांचे दर घटल्याने बळीराजा अधिकच चिंतेत सापडला आहे.

भाजीपाल्याच्या दरात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडून गेले आहे. भाजीपाला पिकांपैकी टोमॅटो, लिंबू, घेवडा, चवळी, फ्लावर, दोडका, मिरची, कोथिंबीर, भेंडी, कारले, दोडका आदी पालेभाज्यांचे दर घसरल्याने उत्पादन खर्च निघणे ही जिकरीचे व अवघड झाले आहे. सध्या बाजारात भाज्यांच्या दरात घट झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे समाधान व्यक्त होत असताना, शेतकरी मात्र चिंतेत सापडला आहे.

काही दिवसांपूव भाज्यांचे दर वाढले होते, ज्यामुळे ग्राहकांना महागाईचा फटका बसत होता. परंतु, आता बाजारात भाज्यांची आवक वाढल्याने भाज्यांचे दर घटले आहेत. भाजीपाल्याच्या दरात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. बाजारात भाजी विक्री करण्यासाठी आलेले शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. उत्पादन वाढवण्याच्या इराद्याने केलेल्या मेहनतीला योग्य मोबदला मिळत नाही. कमी दरांमुळे शेतकरी आपल्या कष्टाचे योग्य मूल्य मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे.

धोरणांची आवश्यकता
भाजीपाल्यांचे भाव कोसळल्याने उत्पादकांचे बजेट कोलमडेले आहे. भाजीपाल्यांच्या दराबाबतही सरकारकडून योग्य धोरणांची आवश्यकता आहे. तरच शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे शक्य होईल. शेतकऱ्यांना योग्य किंमत मिळवण्यासाठी आणि त्यांच्या कष्टाची कदर होण्यासाठी सरकारने शेतकरी अनुकूल धोरणांचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे आहे, असे श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी बाळासाहेब चव्हाण, चंद्रसेन बोराटे यांनी नगर सह्याद्रीशी बोलतांना सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना सोडू नका; मंत्री धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?

Politics News: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यामध्ये धनजंय...

साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक; गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

शिर्डी । नगर सहयाद्री:- भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक होत असल्याचा...

‘पारनेरला शनिवारी राष्ट्रवादीचा मेळावा’; कोण राहणार उपस्थित?

तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर यांची माहिती पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या...

नगर शहरात 36 जागांवर ‌‘पे अँड पार्क‌’; पार्किंगसाठी दर काय? वाचा महत्वाची बातमी..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर शहरात वाहतूक नियोजन, पार्किंग व्यवस्था, एकेरी वाहतूक आदींचे नियोजन करत...