spot_img
अहमदनगर'परतीच्या पावसामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी'

‘परतीच्या पावसामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी’

spot_img

अमदनगरमध्ये ९१६ हेक्टरवर नुकसान
मुंबई | नगर सह्याद्री:-
राज्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पडणार्‍या परतीच्या पावासाने मोठं नुकसान झालं आहे. परतीच्या पावसामुळे राज्यातील बळीराजा चिंतेत आला आहे. या पावसामुळे हजारो हेटर शेतीचे मोठं नुकसान झाले आहे. या पावसामुळे बळीराजाच्या डोळ्यामध्ये अक्षरश: पाणी आले आहे. अशामध्ये लवकरात लवकर शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २ दिवस झालेल्या परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकाचे मोठे नुकसान होत आहे. २४ आणि २५ सप्टेंबर रोजी पडलेल्या पावसामुळे राज्यातील १२ जिल्ह्यांतील ३२९९७.३० हेटरवरील पिके मातीमोल झाली आहे. सोयाबीन पिकाचे जास्त नुकसान झालं आहे. परतीच्या पावसाचा मराठवाड्याला सर्वाधिक फटका बसला आहे.

बीडमध्ये ८ हजार हेटर, धाराशिवमध्ये ७ हजार हेटर, नांदेडमध्ये ५ हजार हेटर, छत्रपती संभाजीनगरमध्ये ४ हजार ५०० हेटरचे नुकसान झाले आहे. मराठवाड्यानंतर सांगली जिल्ह्यात नुकसानीची तीव्रता जास्त आहे. सांगलीत ४ हजार ८६७ हेटरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सोलापुरात ३ हजार २०० हेटर, पुण्यात ४३० हेटर, अहमदनगरमध्ये ९१६ हेटर, जळगावात ३१७ हेटर, नाशिकमध्ये २५ हेटर, धुळ्यात १ हजार ७० हेटर आणि पालघरमध्ये ५५.८० हेटरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

पावसामुळे शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकर्‍याच्या डोळ्यामध्ये पाणी आले आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्यामुळे बळीराजा चिंतेत आला आहे. अशामध्ये सरकारने लवकरात लवकर नुकसानग्रस्त भागांची पंचनामे करावे आणि शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सरकारच्या घोषणा ‘लाडक्या खुर्चीसाठी’; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल | नगरमध्ये शिवस्वराज्य यात्रा अहमदनगर | नगर सह्याद्री:- सध्या राज्यात...

Ahmednagar Crime: एमआयडीसीत अवैध धंदा? दोन जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर | नगर सह्याद्री ग्राहक दक्षता कल्याण फाऊंडेशनच्या तक्रारीनंतर पुरवठा विभागाने नगर- मनमाड रस्त्यालगत एमआयडीसी...

विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार! पत्रकार परिषदेत कोणी दिला इशारा?, कारण काय? वाचा..

अहमदनगर । नगर सह्याद्री:- धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, अशी गेली 68 वर्षांपासून मागणी...