spot_img
ब्रेकिंग'शहरात बकरी ईद उत्साहात साजरी'

‘शहरात बकरी ईद उत्साहात साजरी’

spot_img

शांतता, समृध्दी व सामाजिक सलोख्यासाठी प्रार्थना
प्रत्यक्ष भेटीगाठीसह सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव
अहमदनगर । नगर सहयाद्री-
शहरासह जिल्ह्यात मुस्लिम समाज बांधवांनी बकरी ईद (ईद उल अजहा) सोमवारी (दि.१७ जून) मोठ्या उत्साहात साजरी केली. शहरातील ईदगाह मैदान येथे सकाळी ९:३० वाजता ईदची नमाज मौलाना नदिम अख्तर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी शहरातील मुस्लिम बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

नमाजच्या प्रारंभी धार्मिक व्याख्यान, नमाजनंतर खुदबा व त्यानंतर मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज अदा केली. देशात शांतता, समृध्दी व सामाजिक सलोख्यासाठी प्रार्थना करण्यात आली. सकाळी ७ वाजल्यापासून शहरातील विविध मशिदी मधून बकरी ईदची नमाज अदा करण्यात आली. ईदनिमित्त प्रमुख नमाज पठण कोठला येथील ईदगाह मैदानात झाले. मुस्लिम बांधवांनी एकमेकांच्या भेटी-गाठी घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.

पोलीस प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून ईदगाह मैदानसह शहरातील चौका-चौकात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोठला येथून जाणारी वाहतूक दुसर्‍या मार्गाने वळविण्यात आली होती. नमाजनंतर शहरातील विविध कब्रस्तान व दर्गामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या बकरी ईदनिमित्त कुर्बानीसाठी लागणारे बोकडं खरेदी-विक्रीत जिल्ह्यात कोट्यावधीची उलाढाल झाली आहे.

जिल्ह्यातील विविध तालुयातील आठवडे बाजारात बोकडांची खरेदी विक्री सुरु होती. बकरी ईदला कुर्बानीसाठी लागणारे बोकडांच्या किंमतीमध्ये या वर्षी मोठी वाढ दिसून आली. बकरी ईद निमित्त तीन दिवस म्हणजे सोमवार पासून बुधवार पर्यंत घरोघरी कुर्बानी केली जाणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कारागृहातून आरोपीने पाठवले साक्षीदाराला धमकीचे पत्र; वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील साई कॉलनी परिसरात साक्षीदाराला पत्राद्वारे धमकी दिल्याचा प्रकार घडला....

पुण्यात नात्यांमध्येच रक्तरंजित थरार; आयुषच्या हत्येची धक्कादायक माहिती उजेडात

पुणे / नगर सह्याद्री - पुणे शहरातील नाना पेठ परिसरामध्ये झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील...

शहरात साहित्योत्सव रंगणार; संमेलनाची तयारी पूर्ण, ११, १२ सप्टेंबरला भरगच्च कार्यक्रम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखा आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य...

शासन निर्णय मागे घेण्याची आवश्यकता नाही!; मंत्री विखे पाटील

मंत्री छगन भुजबळ यांची मागणी फेटाळली मुंबई । नगर सहयाद्री:- मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीने...