Maharashtra Crime News: बजरंग दलाचे जिल्हा गोरक्षा प्रमुख सतेंद्र उर्फ मॉन्टी यांची क्रूर हत्या झाली. जेवणात १० झोपेच्या गोळ्या देऊन सतेंद्र यांना बेशुद्ध केले होते. त्यानंतर सावत्र भाऊ मानव उर्फ बंटूने कुऱ्हाडीने गळा चिरून खून केला. सकाळी दुधवाल्याला सतेंद्र यांचा मृतदेह खाटेवर रक्तरंजित अवस्थेत आढळला, त्यानंतर सदरचे प्रकरण उघडकीस आले.
पोलिसांनी याप्रकरणी सावत्र भाऊ मानव उर्फ बंटूला अटक केली. वडील बलराम सिंह, सावत्र आई मधुबाला, सावत्र बहीण शालू आणि तिचा पती अनुज यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.सोमवारी सकाळी दूधवाल्याला घरात मधुबाला बेशुद्ध अवस्थेत आणि मॉन्टी यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. त्याने पोलिसांना तात्काळ माहिती दिली.
हत्येची माहिती समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार, जमिनीच्या वाटणीवरून कौटुंबिक वाद हत्येमागचे कारण आहे. मॉन्टी आणि बंटी यांच्यामध्ये जमिनिचा वाद होता. मॉन्टी याच्या हत्येनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. तपासात मॉन्टी यांच्या हत्येमागे कौटुंबिक वाद आणि जमिनीच्या वाटणीचा वाद असल्याचे समोर आले आहे.