spot_img
अहमदनगरजादा परताव्याचे आमिष; १.६० कोटींची फसवणूक, १५ आरोपी, पोलिसांनी केले असे...

जादा परताव्याचे आमिष; १.६० कोटींची फसवणूक, १५ आरोपी, पोलिसांनी केले असे…

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अहिल्यानगरमध्ये इनफिनाईट बिकन इंडिया प्रा. लि. आणि ट्रेड्स इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. या बनावट कंपन्यांनी जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून शिक्षिका सौ. अनामिका दिलीपराव शिंदे आणि इतर गुंतवणूकदारांची तब्बल १ कोटी ६० लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सौ. अनामिका शिंदे यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात १५ जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सौ. अनामिका शिंदे (वय ३८, रा. भगवान बाबा चौक, निर्मलनगर) यांनी त्यांच्या मैत्रिणीकडून या कंपन्यांबाबत माहिती मिळाल्यावर गुंतवणूक केली. कंपनीचे सीईओ अगस्त मिश्रा, संचालक राहुल काळोखे, गौरव सुखदेव, प्रसाद कुलकर्णी, सचिन खडतरे, चेतन धर, नवनाथ औताडे, ययाती मिश्रा, शुभम आवताडे, विनोद गाडीलकर, विनायक मराठे, प्रसाद देशमुख, हेमंत चव्हान, संदीप दरेकर आणि पांडुरंग खामकर यांनी १० ते १२ टक्के परताव्याचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. सौ. अनामिका यांनी स्वतः ९ लाख ५० हजार, तर त्यांच्या नातेवाईक आणि मित्रांनी १ कोटी ६० लाख रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर गुंतवले. सुरुवातीला कंपनीने एक वर्ष परतावा दिला, परंतु फेब्रुवारी २०२५ पासून परतावा आणि मुद्दल देणे बंद केले.

कंपनीने वेबसाइट पोर्टल तीन वेळा बदलले आणि गुंतवणूकदारांना क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे वर्ग केल्याचे सांगितले. मार्च-एप्रिल २०२५ मध्ये विड्रॉल बटणाद्वारे रक्कम काढण्याचा प्रयत्न करूनही पैसे मिळाले नाहीत. पुण्यातील ट्रेड्स आणि इनफिनाईट बिकनच्या कार्यालयात संपर्क साधला असता, कार्यालय बंद असल्याचे आढळले. यामुळे फसवणुकीचा संशय बळावला.
सौ. अनामिका यांनी जिल्हा न्यायालयात अर्ज केला, ज्यावर ३० ऑगस्ट २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्याचे आदेश झाले. तोफखाना पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सपोनि कल्पना चव्हाण करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सावधान! महाराष्ट्रावर दुहेरी चक्रीवादळाचं सावट! पुढील काही दिवस पावसाचे, IMD इशारा..

मुंबई / नगर सह्याद्री : महाराष्ट्रावर दुहेरी चक्रीवादळाचं संकट आलं आहे. बंगालच्या उपसागरातील ‘मोंथा’ आणि...

सातारा महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणात नवा ट्विस्ट; आई-वडिल समोर, पोलीस अन् राजकीय दबावावर भाष्य

सातारा / नगर सह्याद्री - जिल्ह्यातील फलटण येथील सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्या...

ट्रस्ट जमीन प्रकरणी जैन समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, अशा आहेत मागण्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री पुणे येथील सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट या सार्वजनिक ट्रस्टच्या विश्वस्त...

क्षुल्लक कारणावरून महिलेवर चाकूहल्ला; नगरमध्ये धक्कादायक प्रकार

भावासह कुटुंबालाही मारहाण | बुरूडगाव येथील घटना अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुयातील बुरुडगाव येथे मला...