spot_img
अहमदनगरमाजी नगराध्यक्ष विजय औटींना जामीन मंजूर!

माजी नगराध्यक्ष विजय औटींना जामीन मंजूर!

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री:-
पारनेर नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक विजय सदाशिव औटी यांना जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी जामिन मंजूर करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी: फिर्यादी अॅड. राहुल बबन झावरे यांच्या वनकुटे गावातील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी आरोपी माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी यास गावातून हाकलून देऊन अपमान केलेल्या कारणावरून दि. ६ जून रोजी रोजी पारनेर शहरात गैर कायद्याची मंडळी जमवून राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला व जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.

या गुन्ह्यात विजय सदाशिव औटी सह २५ जणांवर भारतीय दंड संहिता कलम ३०७ ३२४ ३२३ ३४१ ४२७ १४३ ४१७ १४८ १४८ ५०४ ५०६ आर्म अॅक्ट ३/२५ ४/२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये पारनेर पोलीस स्टेशन मध्ये गु.नं. ४१४/२०२४ प्रमाणे दाखल झालेला आहे.. सदर गुन्ह्यात विजय औटी, नंदकुमार औटी, प्रीतेश पानमंद, मंगेश कावरे यांना सदर गुन्ह्यात दि. ७ जून रोजी अटक करण्यात आली होती.

आरोपी विजय सदाशिव औटी यांनी मा. जिल्हा सत्र नायाधीश अहमदनगर यांच्याकडे अॅड. अविनाश गंगाधर लांडे यांच्यामार्फत नियमित जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्या अर्जावर दोन्ही पक्षाचे युक्तिवाद झाले. त्यानंतर आरोपी विजय सदाशिव औटी यांच्या वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोमवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

वेळ संघर्षाची होती पण…!
वेळ संघर्षाची होती, पण साथ होती आपल्या माणसांची….! कट रचला होता मला गुंतवण्याचा तो यशस्वी ही झाला, १११ दिवस कारागृहात कैद झालो, आयुष्यात खूप संघर्ष करत आलोय, खूप अडचणी आल्या त्यावर मात करण्याची ताकद आई तुळजाभवानीने दिली आहे. जेवढा संघर्ष केलाय यश त्याच्या दुप्पट नक्कीच असणार, मला गुंतवण्यासाठी खोटे कलम टाकून मला कारागृहात टाकले. जो पर्यत चारित्राची बदनामी होत नाही तो पर्यत इतिहास घडत नाही, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आणि साथ या पुढेही देखील माझ्यासोबत असेल अशी अपेक्षा करतो…! आज मला जामीन मंजूर झाला त्याबद्दल माझ्या सर्व वकील, माझे सहकारी यांचा मी आयुष्यभर ऋणी राहील.
– विजय सदाशिव औटी ( मा. नगराध्यक्ष नगरपंचायत, पारनेर)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी दुर्घटना! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कुल बस घाटात पलटली; ३५ विद्यार्थी…

संगमनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुयात शाळेच्या बसला अपघात झाला आहे. पुणे...

राज ठाकरेंच्या घातपाताचा प्लॅन: ‘बड्या’ नेत्याचा खळबळजनक आरोप

मुंबई। नगर सहयाद्री: महाराष्ट्राच्या राजकारणात आता राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच...

आमदार काशीनाथ दाते यांच्या प्रयत्नांना यश; पारनेरची जलक्रांती निर्णायक वळणावर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुयातील जलसंपत्ती विकासाला चालना देण्यासाठी आमदार काशिनाथ दाते यांनी गेल्या...

सुसाट टेम्पोने उडविल्या १० दुचाकी, अहिल्यानगर शहरातील दुर्घटना कशी घडली?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एका टेम्पोने चारचाकीसह ८ ते १०...