spot_img
महाराष्ट्रराज्यात पुन्हा बदलापूरच्या घटनेला लाजवणारी घटना; नराधम अक्षय शिंदे पेक्षाही वरचढ

राज्यात पुन्हा बदलापूरच्या घटनेला लाजवणारी घटना; नराधम अक्षय शिंदे पेक्षाही वरचढ

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
कल्याण येथील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून खून करणारा आरोपी विशाल गवळी शेगावमध्ये असल्याची माहिती शेगाव पोलिसांना सकाळी मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे शेगाव पोलिसांनी तत्काळ सापळा रचून शिवाजी चौकातील एका सलूनमधून विशाल गवळीला अटक केली. आरोपी शेविंग करून आपला लूक बदलण्याच्या प्रयत्नात असताना अर्ध्या तासापूर्वीच ही कारवाई करण्यात आली.

राज्यात बदलापूरच्या घटनेला लाजवणारी घटना कल्याण पूर्वेत घडली आहे. विशाल गवळी या नराधमाने 13 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. मुलीची हत्या करून भिवंडी तालुक्यातील बापगाव परिसरात मृतदेह फेकून दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस वेगवेगळी पथकं तयार करून मुलीचा शोध घेत होते .मात्र मंगळवारी सकाळी बापगाव परिसरात एक अज्ञात अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली .दरम्यान,या घटनेतील आरोपी शेगावमध्ये असल्याची टीप मिळाल्यानंतर शेगाव पोलिसांनी सापळा रचत शेगाव शहरातील शिवाजी चौकातील एका सलून मधून शेविंग करत असताना विशाल गवळीला ताब्यात घेतलं.

आरोपीने घटनेनंतर स्वतःचा लूक बदलून पोलिसांपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या वेगवान हालचालींमुळे त्याचा हा डाव उधळला गेला. पुढील तपास सध्या सुरू आहे आणि आरोपीच्या पत्नीचा यात नेमका कसा सहभाग होता, याची सखोल चौकशी केली जात आहे.ही घटना उघड झाल्याने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

विशाल गवळी सध्या शेगाव पोलीस ठाण्यात आहे. या घटनेतील आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, ती म्हणजे आरोपीच्या तिसऱ्या पत्नीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याला मदत केली होती. पतीने तिला पहिल्या दोन पत्नींसारखे सोडून देऊ नये, यासाठी तिने हे पाऊल उचलले असल्याचे स्पष्ट झाले आहे.तपासादरम्यान विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीने मिळून मृतदेह एका रिक्षाच्या सहाय्याने भिवंडी तालुक्यातील बापगाव परिसरात फेकून दिल्याचे निष्पन्न झाले आहे. विशाल गवळीला शोधण्यासाठी पोलीस पथक सक्रिय होते, आणि शेगाव पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन मोठ्या गुन्ह्याची उकल केली आहे.

विशाल गवळी हा बदलापूरच्या अक्षय शिंदेपेक्षाही वरचढ विकृत असल्याचे समोर आले आहे . विशाल याचे आत्तापर्यंत तीन लग्न झाले आहेत . त्याच्या दोन बायका त्याला सोडून गेल्या आहेत. तिसरी बायको एका खाजगी बँकेत नोकरीला आहे . या विकृताने क्लासवरून घरी जाणाऱ्या एका मुलीवर भररस्त्यात तिला खाली पाडून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महापालिकेत कोणताही घोटाळा नाही; आयुक्तांचे स्पष्टीकरण, आमदार जगताप यांच्याबद्दल म्हणाले…

  महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचे स्पष्टीकरण अहिल्यानगर / नगर सह्याद्री - महानगरपालिकेत सुमारे ७७६...

महादेव मुंडे हत्या प्रकरण: न्याय मिळत नसल्याने पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

ज्ञानेश्वरी मुंडेने घेतले विष । बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल बीड | नगर सह्याद्री राज्यात संतोष देशमुख...

११ गावांसह २१ वाड्यांना मिळणार पाणी; मंत्री विखे पाटील यांची मोठी माहिती

संगमनेर | नगर सह्याद्री अकोले तालुयातील पिंपळगाव खांड धरणातून संगमनेर तालुयातील पठार भागातील जवळे बाळेश्वरसह...

मविआच्या आमदारांचं टॉवेल-बनियनवर आंदोलन

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. बुधवारी विरोधकांनी सत्ताधार्‍यांविरोधात आक्रमक पवित्रा...