spot_img
अहमदनगरसुप्यात अल्पवयीन मुलींला छेडणारा बाबुराव अडकला जाळ्यात!

सुप्यात अल्पवयीन मुलींला छेडणारा बाबुराव अडकला जाळ्यात!

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
सुपा पोलीस ठाणे हद्दीत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीला कोतवाली पोलिसांनी पकडून सुपा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. बाबुराव हरीभाऊ शिंदे (रा. वाळवणे, सुपा, ता. पारनेर) असे त्याचे नाव आहे. सुपा पोलीस ठाणे येथे विनयभंग, पोक्सो कलमान्वये मंगळवारी (१८ मार्च) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास सुपा पोलिसांकडून सुरू होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस अधीक्षक राकेशओला यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना संशयित आरोपीच्या शोधासाठी सतर्क राहण्याचे आदेश दिले होते. तसेच, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी अहिल्यानगर शहरातील पोलिसांना अलर्ट करून संशयित आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आणि गुन्हे शोध पथक संशयित आरोपीचा शोध घेत होते. दरम्यान, अहिल्यानगर शहरातील अमरधाम रस्ता येथे संशयित आरोपी बाबुराव हरीभाऊ शिंदे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

तातडीने कारवाई करत पोलिसांनी गाडगीळ पटांगण, अमरधाम रस्ता येथे त्याला पकडले. त्याला सुपा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. निरीक्षक दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक योगीता कोकाटे, उपनिरीक्षक गणेश देशमुख, अंमलदार विशाल दळवी, संदीप पितळे, योगेश भिंगारदिवे, रोहिणी दरंदले, दीपक रोहोकले, तानाजी पवार, महेश पवार, अभय कदम, सुरज कदम, अमोल गाडे तसेच दक्षिण विभाग मोबाईल सेलचे राहुल गुंडु यांनी ही कामगिरी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कर्मचाऱ्यांची आयुक्तांकडून कानउघडणी; ‘या’ विभागातील कामकाजाचा घेतला आढावा

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- बांधकाम परवानगीसह सर्व प्रकरणांची ऑनलाईन फाईल दाखल होण्यापूर्वी त्याची छाननी...

दळवी साहेब, ‌‘रयत‌’मध्ये नक्की चाललंय काय?;‘दादा‌’ अन्‌‍ ‌‘मामा‌’ची अनेकवर्षांपासून दुकानदारी

आमदार आषुतोश काळे उत्तर विभागाचे नामधारी अध्यक्ष | ‌‘दादा‌’ अन्‌‍ ‌‘मामा‌’ची अनेकवर्षांपासून दुकानदारी पाटलाग बातमीचा।...

पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळा; माजी चेरमनला भल्या पहाटे अटक

पारनेर | नगर सह्याद्री आझाद ठुबे यांच्या अधिपत्याखालील राजे शिवाजी पतसंस्थेतील कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी...

संदीप थोरातच्या अडचणी वाढल्या; एका गुन्ह्यातून दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग…

न्यायालयाने दिला महत्वाचा निर्णय सह्याद्रीचे मल्टीनिधीचे ठेवीदार पोलिसांत अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- गुंतवणुकीवर जास्तीचा परतावा देण्याच्या अमिषातून...