spot_img
ब्रेकिंगबाबांची शिर्डी पुन्हा हादरली! पोटच्या पोराने बापाचा काटा काढला?

बाबांची शिर्डी पुन्हा हादरली! पोटच्या पोराने बापाचा काटा काढला?

spot_img

शिर्डी । नगर सहयाद्री:-
महिनाभरापूर्वी साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांना भोसकत संपवल्यानंतर दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. आता पुन्हा शिर्डीत घरगुती वादातून पोटच्या मुलानेच वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.आधी हत्या दडवण्याचा प्रयत्न करत नामानिराळा राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या या तरुणाच पितळ शवविच्छेदन अहवालातून उघडे पडले आहे.आकस्मिक मृत्यूच्या नावाखाली वडिलांच्या हत्येच्या पापापासून पासून सुटू पाहणाऱ्या मुलाविरोधात पोलिसांनीच तक्रार नोंदवत त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवला आहे.

दत्तात्रय शंकर गोंदकर असे मारहाणीतून हत्या झालेल्या 54 वर्षीय वडिलांचे नाव आहे. तर शुभम गोंदकर असे आरोपी मुलाचे नाव आहे. शिर्डी मध्ये 6 मार्च 2025 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास सदरची घटना घडली होती. दत्तात्रय शंकर गोंदकर यांना घरगुती वादातून शुभम गोंदकर या त्यांच्या मुलाने पाईप ने मारहाण केली. ही मारहाण इतकी गंभीर होती की या मारहाणीतच दत्तात्रेय गोंदकर यांचा मृत्यू झाला.

मारहाणीत मृत्यू झाल्याचे कोणाला कळू नये म्हणून शुभम गोंकरने वडिलांचा अकस्मात मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र शवविच्छेदन अहवालात त्याचे पितळ उघडे पडले. मारहाणीतच दत्तात्रय गोंदकर यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. ही माहिती समोर आल्यानंतर शिर्डी पोलिसांनी स्वतः फिर्याद नोंदवत शुभम गोंदकर वर गुन्हा नोंदवला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? तर तर ‘ही’ आहेत सर्वोत्तम ठिकाणे

मुंबई । नगर सहयाद्री:- कडक उन्हाळ्यात बरेच जण बाहेर फिरायला जायचा प्लॅन करत असतात....

रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! १०० आणि २०० च्या नव्या नोटा लॉन्च करणार!, जुन्या नोटा…

Reserve Bank Of India: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक मोठी घोषणा केली आहे. १००...

नशीब चमकणार! ‘या’ राशीसाठी आनंदाची बातमी, वाचा राशिभविष्य..

मुंबई । नगर सह्याद्री मेष राशी भविष्य तुमची कमकुवत इच्छाशक्ती यामुळे तुम्ही भावनिक व मानसिकदृष्ट्या कमजोर...

विना परवाना रस्ता खोदणे पडले महागात’; महापालिकेची मोठी कारवाई

अहिल्यानगर | नगर सह्याद्री चितळे रस्त्यावर भराड गल्ली येथे महिनाभरापूव नव्याने करण्यात आलेला काँक्रिटचा रस्ता...