spot_img
देशअयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा! पहा एका क्लिकवर..

अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा! पहा एका क्लिकवर..

spot_img

नगर सहयाद्री टीम-

22 जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. पंतप्रधान अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन करणार आहे.त्या पाश्ववभूमीवर देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे.

अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी महंत नृत्यगोपालदास जी महाराज (अध्यक्ष, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र) पंतप्रधान नरेंद्र मोदी, डॉ. मोहन भागवत (सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) श्रीमती आनंदीबेन पटेल(राज्यपाल, उत्तर प्रदेश) योगी आदित्यनाथ (मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश), यांच्यासह देशातील १२५परंपराचे संत-महापुरुष व भारतातील २,५०० श्रेठ पुरुषाची उपस्थिती राहणार आहे.

अयोध्या राम मंदिर सोहळ्याच्या कार्यक्रमास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. मंदिरात प्राणप्रतिष्ठा पूजा पाच तास चालणार आहे. प्राणप्रतिष्ठेसाठी ८४ सेंकदाचा मुहूर्त असणार आहे. सकाळी १२:२९ ते १२:३० दरम्यान प्राणप्रतिष्ठा होणार आहे. रामलल्लाची स्थापना झाल्यावर महापूजा आणि महाआरती होणार आहे.

असा असणार कार्यक्रम?

१०: ३० पर्यंत प्रमुख अतिथींचे आगमन
१२:२० मुख्य प्राणप्रतिष्ठा पूजा
१२:२९ PM ते १२:३० प्राणप्रतिष्ठा
प्राणप्रतिष्ठेनंतर महापूजा आणि महाआरती
१ ते २ पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, मोहन भागवत व महंत नृत्यगोपाल दास यांचे संबोधन
२.३० पासून 8000 आमंत्रित पाहुण्यांना दर्शन घेता येणार
५० देशांमधून आलेले प्रतिनिधी रामलल्लाचे दर्शन घेणार

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम टीव्हीवर कसा पाहायचा?
जर तुम्हाला हा कार्यक्रम टीव्हीवर पाहायचा असेल तर तुम्ही 22 जानेवारीला सकाळपासून दूरदर्शन पाहू शकता. 22 जानेवारीला सकाळपासून राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनच्या विविध भाषिक वाहिन्यांवर दाखवले जमा आहे.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम मोबाईलवर कसा पाहायचा?
तुम्हाला राम मंदिराशी संबंधित दूरदर्शनच्या YouTube चॅनेलवर प्राण-प्रतिष्ठा चे थेट प्रक्षेपण पाहण्याचा पर्याय देखील मिळेल. दुसरा पर्याय ही उपलब्ध आहे. तुमच्या फोनवर Jio Cinema अॅप डाउनलोड करा. जिओ सिनेमा अॅपमध्ये प्राण-प्रतिष्ठा नावाचा एक समर्पित विभाग तयार करण्यात आला आहे, ज्यामध्ये या भव्य कार्यक्रमाचे संपूर्ण चित्र दाखवले जाईल.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...