पारनेर / नगर सह्याद्री –
सोमवार दि. २३ डिसेंबर २०२४ परतीचा मान्सून समाधानकारक न झाल्यामुळे चारा पिके तसेच शेती पिके वाचवण्याच्या उद्देशाने मांड ओहळ धरणाच्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्याची मागणी खडकवाडी, पळशी, वासुंदे, शिक्री येथील लाभधारक शेतकऱ्यांनी आमदार काशिनाथ दाते सर यांच्याकडे निवेद्वानाद्वारे केली होती. मांडओहळ धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. निवेदनात म्हटले आहे की रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा या पिकांसाठी पाण्याची गरज असल्याने शेवटच्या लाभार्थ्याला पाणी मिळावे अशी मागणी शेतकऱ्यांची असल्यामुळे आमदार काशिनाथ दाते सरांनी अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक करून पाणी सोडण्याबाबतच्या सूचना त्यांना दिले आहेत.
निवेदनात प्रगतशील शेतकरी विकास रोकडे, सखाराम नवले, शिवाजी गागरे, धनंजय ठोकळे, विठ्ठल शिंदे, अमोल रोकडे, गणेश चौधरी, विठ्ठल हुलावळे, अरुण गागरे, संतोष शिंदे, आनंद खोडदे, अंबादास नवले, पंकज गागरे, भाऊसाहेब फटांगरे, अनिल गागरे इ. लाभार्थी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
मांडओहळ धरणाच्या उजव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी आवर्तन सोडण्याबाबत शेतकऱ्यांचे निवेदन प्राप्त झाले आहे. उद्या सकाळी ७ वा. आवर्तन सोडण्यात येणार आहे तशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
आमदार काशिनाथ दाते