spot_img
ब्रेकिंगमामीचा जीव भाच्यावर जडला, मामाचा काटाच काढला!; धक्कादायक प्रकार नेमका घडला कुठे?

मामीचा जीव भाच्यावर जडला, मामाचा काटाच काढला!; धक्कादायक प्रकार नेमका घडला कुठे?

spot_img

Crime News: भाच्याच्या प्रेमात वेडीपिसी झालेल्या मामीनं आपल्याच पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेने भाचा आणि त्याच्या मित्राच्या मदतीने पतीचा काटा काढला आहे. आधी गळा आवळून पतीची हत्या केली. नंतर पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या तपासात महिलेनं आपल्या पतीची हत्या भाच्याच्या मदतीने केली असल्याचं समोर आलं. या प्रकरणी पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.

अधिक माहिती अशी: गौरव नावाच्या तरूणाची हत्या पत्नी प्रीती आणि भाचा निमेश आणि त्याच्या मित्राने मिळून केली आहे. पत्नी प्रीती आणि भाचा निमेश या दोघांमध्ये अनैतिक संबंध होते. प्रीती आपल्या भाच्याच्या प्रेमात अगदी वेडीपिसी झाली होती. मात्र, नवऱ्याची अडचण होत असल्यामुळे पत्नीनं नवऱ्याचा काटा काढण्याचे ठरवले.

तिने नवऱ्याच्या हत्येचा प्लान आखला. भाचा आणि मित्राच्या मदतीने पत्नीनं आपल्या पतीची गळा आवळून हत्या केल्याची घटना यूपीच्या बुलंदशहरमध्ये घडली आहे. हत्या केल्यानंतर पत्नीनं मृतदेह रोडवर ठेवलं आणि अपघाताचा बनाव रचला. ३० जानेवारीला पत्नीनं पोलीस ठाण्यात धाव घेतली, आणि पतीचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तपास सुरू केला.

पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये पती गौरवचा मृत्यू अपघाती नसून गळा आवळून हत्या केली असल्याचं समोर आलं. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी पत्नी, भाचा आणि त्यांच्या मित्राला अटक करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत आणखी कुणाचा सहभाग आहे का? याचा तपास पोलीस करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संशयाच्या भुताने संसाराची राख रांगोळी; पत्नीचा निर्घुण खून

पत्नीचा निर्घुण खून । पतीला अटक अहिल्यानगर। नगर सहयाद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथे...

पेट्रोल पंपावर ऑनलाइन पेमेंट बंद! कारण काय?

मुंबई । नगर सहयाद्री:- डिजिटलच्या युगात सर्व ऑनलाइन झाले आहे. पेट्रोल भरल्यानंतरही आपण ऑनलाइन पद्धतीने...

धनलक्ष्मीचा योग आला! ‘या’ राशींच्या जीवनात पैशांचा पाऊस पडणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य एकदा का हे प्रश्न सुटले की घरातील वातावरण...

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...