अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अनेक दशकांपासून बीडवासीयांचे स्वप्न असलेली रेल्वे अखेर वास्तवात उतरली आहे. आज बीड-अहिल्यानगर रेल्वेमार्गाचा पहिला टप्पा सुरू झाला असून बीडहून पहिली रेल्वेगाडी अहिल्यानगरकडे धावली.
या ऐतिहासिक क्षणाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेसाठी आतुरलेले बीडकर या क्षणाने भारावून गेले. पहिल्यांदाच रेल्वेत बसण्याचा आनंद घेताना नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमान झळकत होता. या रेल्वेमुळे बीड जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.