spot_img
अहमदनगरसमाजकंटकांचा बाधा आणण्याचा प्रयत्न; ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण, मोठा फौजफाट्यासह रॅपीड ॲक्शन फोर्सची...

समाजकंटकांचा बाधा आणण्याचा प्रयत्न; ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण, मोठा फौजफाट्यासह रॅपीड ॲक्शन फोर्सची तुकडी दाखल, नेमकं काय घडलं?

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
नगर तालुक्यातील सारोळा कासार येथील ग्रामदैवत पूर्वमुखी हनुमान मंदिरात मूतच्या चौथऱ्यावर पाठीमागील बाजूस अज्ञात समाज कंटकाने मांसाचे तुकडे ठेवून विटंबना केल्याचा प्रकार 22 सप्टेंबर रोजी सकाळी निदर्शनास आला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरलेले असून पोलिसांनी तातडीने या समाजकंटकांचा शोध घ्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. या घटनेनंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा गावात तैनात करण्यात आला असून गावात तणावपूर्ण वातावरण पसरलेले आहे.

गावच्या वेशीबाहेरच पुर्वामुखी हनुमान मंदिर आहे. या ठिकाणी सकाळी दर्शनाला गेल्यावर हा प्रकार काहींच्या निदर्शनास आला. त्यामुळे गावात संतापाचे वातावरण पसरले, अनेक ग्रामस्थ, तरुण मोठ्या संख्येने मंदिराजवळ जमा झाले. पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर नगर तालुका पोलिस ठाण्याचे स.पो.नि. प्रल्हाद गिते हे मोठ्या फौजफाट्यासह गावात दाखल झाले. काही वेळातच नगर ग्रामीणचे पोलिस उपअधिक्षक शिरीष वमने हे ही फौजफाट्यासह गावात आले. रॅपीड ॲक्शन फोर्स ची तुकडीही आली. पोलिस अधिकाऱ्यांच्या समोर ग्रामस्थांनी आक्रमक पणे आपल्या संतप्त भावना व्यक्त करत आरोपीला तातडीने पकडण्याची मागणी केली.

पोलिस अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना शांततेचे आवाहन करत आम्ही तपास सुरु केला असून आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यानंतर सारोळा कासार येथील युवक व ग्रामस्थांनी तातडीने मंदिराची स्वच्छता करून शुद्धीकरणाचा विधी केला. श्री हनुमान मूतला पाणी व दुधाने अभिषेक करून आरती, हनुमान चालीसा आदींचे पठण करण्यात आले व मंदिराचे पावित््रय पुनर्स्थापित करण्यात आले. पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी शांततेत या घटनेचा निषेध नोंदवला.

सारोळा कासार गावात सर्व जातीधर्माचे लोक वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने राहात आहेत. गाव सुशिक्षित आहे. परंतु गावात इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडल्याने गावातील शांतता, ऐक्य व बंधुभाव याला बाधा आणण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे हे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर दक्षिण जिल्ह्याला झोडपले; नद्यांना पूर, पिके पाण्यात

पाथर्डी, जामखेड, नगर, श्रीगोंदा, कर्जतमध्ये तुफान पाऊस अहिल्यानगर | नगर सह्याद्री गेल्या आठ दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात...

अबब… थेट पोलिस निरीक्षकालाच मागीतली दोन कोटींची खंडणी! अहिल्यानगर पोलीस दलात मोठी खळबळ

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जुहू (मुंबई) येथे मेहुण्याच्या हॉटेलमध्ये रिसेप्शनीस्ट आणि पुढे व्यवस्थापक म्हणून काम...

शहरात खळबळ! खासदार ओवेसी यांच्या सभेला विरोध करणाऱ्या वकिलास जीवे मारण्याची धमकी, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेस विरोध करणाऱ्या वकिलास जीवे मारण्याची...

राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवी मंदिरात घटस्थापना उत्साहात

निघोज | नगर सह्याद्री राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीची घटस्थापना विधिवत पूजा करीत उत्साहात...