spot_img
अहमदनगरअल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; नागरिकांनी रोखला "नगर-कल्याण महामार्ग"

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; नागरिकांनी रोखला “नगर-कल्याण महामार्ग”

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री:-
जखणगाव येथील अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणार्‍या मुख्य आरोपीच्या सहआरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी नगर-कल्याण महामार्गावर जखणगाव येथे सकाळी १० वाजता पंचक्रोशीतील संतप्त ग्रामस्थांकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

सहआरोपीना अटक न झाल्यास दोन दिवसानी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी पोलीस प्रशासनाला देण्यात आला. सहआरोपींंना अटक केली जाईल असे आश्वासन यावेळी तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रल्हाद गिते यानी दिला.जखणगाव येथे पाच सहा दिवसांदिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर अतिप्रंसग करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली. मात्र एफआय आर मधील क्रमांक ६७४ मधील सह आरोपीना तात्काळ अटक न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले होते. मात्र सह आरोपीना अटक न झाल्यामुळे आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

जखणगाव मधील अल्पवयीन मुलीवर अतिप्रसग करण्याचा प्रयत्न करण्य आला व सदर गुन्हा दडपण्यासाठी मुलींच्या कुंटुबीयांना धमकी देऊन अमानुष मारहाण करण्यात आली. याबाबत तालुका पोलीस ठाण्यामध्ये ६७४ क्रंमाक नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात मुख्य आरोपीना अटक करण्यात आलेली आहे.पंरतु सहआरोपी अद्यापही मोकाट फिरत आहेत. त्यांच्याकडून अप्रत्यक्षपणे मुलींच्या कुंटुबीयांवर दबाव व धमकी देण्याचा प्रकार घडत आहेत. ही अतिशय गंभीर बाब असून प्रशासनातर्फे याची गंभीर दखल न घेतल्यामुळे सहआरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत.

बदलापूर अरण व कोलकाता येथील डॉटरवर झालेल्या अत्याचाराने सर्व भयभीत झालेले असताना पोलीस प्रशासनातर्फे या घटनेची गंभीर दखल न घेता आरोपीना मोकाट सोडून मुलीला किंवा तिच्या कुंटुबीयांना काही इजा किंवा त्रास झाल्यास प्रशासन जबाबदार असेल. सदर घटनेचा गांभीर्य ओळखून इतर सह आरोपींना तात्काळ २४ तासाच्या आत करावी, असे निवेदन देण्यात आले होते.

यावेळी सरपंच डॉ. सुनील गंधे, माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, पचायत समितीचे माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार, समता परिषद तालुका अध्यक्ष रामदास फुले, बाळासाहेब कर्डिले, बाळासाहेब शहाणे, मनोहर काळे, तात्यासाहेब कर्डिले, संजय जपकर, प्रकाश कुलट, राजू नरवडे, बी. आर. कर्डिले, रवी शिंदे, बाळासाहेब थोरात, बाबासाहेब भिसे, विजय जगताप, सुरेश नरवडे, माजी सरपंच राजाराम कर्डिले यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात होता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्याला गोळ्या घाला…; निंबळक बायपास चौकात रास्तारोको

हिंगणगाव, हमीदपूर, निंबळक, इसळक, खारेकर्जुने ग्रामस्थांचा निंबळक बायपास चौकात रास्तारोको अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गेल्या...

आता शिवशक्ती बरोबर भीमशक्ती; ‘महापालिका निवडणुकीसाठी आघाडी’; किरण काळे यांनी दिली मोठी माहिती..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. नगरकरांनी मनपा कारभारासाठी कायम...

चुलत्याला वाचवण्यासाठी गेलेल्या पुतण्यावर धारदार शस्त्राने सपासप हल्ला, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्रील:- माझ्या शेतातील लाकडे का आणली? असा जाब विचारत एका तरुणाला...

शिवसेनेला भाजपचा झटका; ‘बड्या’ नेत्याचा भाजपत प्रवेश!

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी अहिल्यानगर शहरातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली...