spot_img
अहमदनगरपोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न; केडगावात नेमकं घडलं काय?

पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न; केडगावात नेमकं घडलं काय?

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
कत्तलीसाठी नेल्या जाणार्‍या गोवंशीय जनावरांची गाडी अडवून कारवाईसाठी थांबलेल्या कोतवाली पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याची घटना केडगाव येथे घडली. यात एकाच्या हातावर मारहाण करण्यात आली. कोतवाली पोलिसांनी केडगावपासून पीकअपचा पाठलाग करत झेंडीगेट येथे वाहन अडवले. चौघांना ताब्यात घेत वाहनातील ३२ गोवंशीय वासरांची सुटका करण्यात आली.

सुप्याकडून नगरच्या दिशेने बोलेरो पिकअपमधून (एमएच १४ ईएम २८४९) गोवंशीय वासरे कत्तलीसाठी नेली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सोनवाडी चौक, केडगाव येथे हा पिकअप अडवण्याचा प्रयत्न केला. चालकाने पथकाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या मदतीसाठी आलेल्या निरंजन कारले याच्या हातावर पिकअपमध्ये चालकाच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीने धारदार वस्तूने मारहाण करून जखमी केले. पथकाने वाहनचा पाठलाग करुन झेंडीगेट येथे पिकअप फिल्मी स्टाईलने ताब्यात घेतला. त्यातून ३२ वासरांची सुटका करण्यात आली.
पोलिसांनी आलया कृष्णा काळे (वय ५०), संदीप आलया काळे (वय २४), आलेश काळे (वय २२), अशोक आलया काळे (वय २६, सर्व रा. औसरी खुर्द, ता. आंबेगाव) या चौघांना ताब्यात घेतले. पोलिस कॉन्स्टेबल राजेंद्र चंद्रभान पालवे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री विखेंवर भाजपची मोठी जबाबदारी; कोल्हेंना…

माजी खा. डॉ. सुजय विखे नगर दक्षिणचे, उत्तर नगर जिल्हा माजी आ. स्नेहलता कोल्हे...

राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत फूट? नेमकं काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का?...

पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी टोळी जेरबंद; पोलिसांनी असा लावला सापळा

४ गुन्हे उघडकीस; ५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, मुख्य सूत्रधारासह तिघे अटकेत ​अहिल्यानगर /...

​घोसपुरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दागिन्यांसह मोठा ऐवज लंपास

​अज्ञात चोरट्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; परिसरात भीतीचे वातावरण ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री...