Allu Arjun: साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या घराबाहेर उस्मानिया विद्यापीठाच्या ज्वाइंट अॅक्शन कमिटीच्या सदस्यांनी रविवारी सायंकाळी तोडफोड केली. हा हल्ला पुष्पा २ चित्रपटाच्या प्रिमियर शो दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेच्या मृत्यूशी संबंधित आहे. आंदोलकांनी मृत महिलेच्या कुटुंबाला १ कोटी रूपयांची मदत देण्याची मागणी केली आहे.
पुष्पा २ च्या प्रिमियर शोवेळी हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती. त्याच गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली आणि एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर, अल्लू अर्जुनने दु:ख व्यक्त करून मृत महिलेच्या कुटुंबाला २५ लाख रूपयांची मदत दिली होती.पण आंदोलकांचा म्हणणं आहे की, मृत महिलेच्या कुटुंबाला अजून अधिक मदत हवी आहे. त्यांनी १ कोटी रूपयांची मागणी केली आणि या कारणावरून ते अल्लू अर्जुनच्या घरावर आंदोलन करण्यासाठी आले होते.
आंदोलन करणाऱ्यांनी अल्लू अर्जुनच्या घराबाहेर घोषणाबाजी करत त्याच्या घराबाहेरील वस्तूंची तोडफोड केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. त्वरित ज्वाइंट अॅक्शन कमिटीच्या सदस्यांना ताब्यात घेण्यात आले. या घटनेवेळी अल्लू अर्जुन घराबाहेर नव्हता, परंतु पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे आणि आंदोलकांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
नेमकं घडलं काय?
गेल्या काही दिवसांपासून अल्लू अर्जूनच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. पुष्पा २ च्या प्रिमियरवेळी हैदराबाद येथील संध्या थिएटरमध्ये अल्लू अर्जूनला पाहण्यासाठी गर्दी जमली होती. गर्दीमुळं चेंगराचेंगरी होऊन एका महिलेचा मृत्यू झाला होता. नंतर अल्लू अर्जूननं दु:ख व्यक्त करून मृत महिलेला आणि जखमी लोकांना मदत करणार असल्याचं सांगितलं.
अल्लू अर्जुननं मृत महिलेच्या कुटुंबाला २५ लाख रूपयांची मदत केली होती. त्यानंतर या प्रकरणी त्याला अटक देखील करण्यात आलं होतं. मात्र, पुन्हा या प्रकरणी काही आंदोलकांनी अल्लू अर्जूनच्या घराबाहेर तोडफोड केली आहे. तसंच मृत महिलेच्या कुटुंबाला १ कोटी रूपयांची मदत करण्यात यावी अशी मागणी केली आहे.