spot_img
अहमदनगरग्रामपंचायत अधिकारी पठाण यांच्यावर हल्ला! ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा काम बंदचा इशारा

ग्रामपंचायत अधिकारी पठाण यांच्यावर हल्ला! ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा काम बंदचा इशारा

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
राहुरी तालुक्यातील म्हैसगाव ग्रामपंचायत येथील ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती शकीला पठाण अमानुष मारहाण झाल्याबाबत आरोपीस त्वरित अटक करून कारवाई करावी या मागणीचे निवेदन ग्रामपंचायत अधिकारी यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष युवराज पाटील व सरचिटणीस अशोक नरसाळे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस उपाधीक्षक प्रशांत खैरे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांना निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी उपस्थित दिलीप नागरगोजे किसन भिंगारदे, माणिकराव घाडगे, राम कार्ले, शहाजी नरसाळे संजय डौले, द्वारकानाथ आंधळे अमोल खाटीक, मेघश्याम गायकवाड, सुभाष दहिफळे दत्तात्रेय गर्जे रवींद्र लांबे आदींसह ग्रामपंचायत अधिकारी उपस्थितीत होते. श्रीमती शकीला पठाण या ग्रामपंचायत अधिकारी या पदावर कार्यरत असून त्या ग्रामपंचायतचे नियमित कर्तव्य बजावत असताना त्यांना गावातील अतिक्रमण काढल्याचा राग मनात धरून दहा ते अकरा लोकांनी अमानुष मारहाण केले.

याबाबत फिर्याद राहुरी पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल आहे. तसेच श्रीमती पठाण यांना मदतीसाठी व भांडण सोडवण्यासाठी आलेल्या संबंधित दहा अकरा लोकांनाही जबर मारहाण केली आहे. यामुळे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांमध्ये भयावह व परिस्थिती निर्माण झाली आहे. श्रीमती पठाण यांना गावात आल्यास जीवे मारण्याचे धमकी देण्यात आली आहे.

जिल्हा अध्यक्ष युवराज पाटील म्हणाले, सदरील भ्याड हल्ल्‌‍याचा निषेध राहुरी तालुक्यातील व अहिल्या नगर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांनी केला आहे. ग्रामपंचायत अधिकारी भयभीत होऊन दहशतीखाली आहेत. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांना भयमुक्त व निर्भय वातावरणात काम करता यावे याकरिता सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. सदर आरोपीवर कायदेशीर कारवाई न झाल्यास जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या वतीने काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

रंजित कासले प्रकरणात मोठं ट्विस्ट; ‘त्या’ 10 लाख रुपयांबाबत धक्कादायक खुलासा, अडचणीत वाढ

बीड / नगर सह्याद्री मोठी बातमी समोर येत आहे, निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले...

पावसाचा पहिला अंदाज आला! राज्यात ‘या’ तारखेला कोसळणार?

Weather Update: -भारतीय हवामान विभागाने २०२५ च्या मान्सून २०२५ च्या हंगामासाठीचा आपला अंदाज जाहीर...

‘राष्ट्रवादीचे सभासद नोंदणीतून बळ वाढणार’; टाकळी ढोकेश्वर गटातून अभियानाला सुरुवात

पारनेर | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानाला पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जिल्हा...

सूर्यदेव आग ओकतोय!, महाराष्ट्रातील ‘या’ भागात तापमान वाढणार..

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यात पुन्हा तापमान वाढायला सुरूवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून...