spot_img
अहमदनगरअहिल्यानगर: महिला वनरक्षकावर हल्ला; फॉरेस्ट परिसरात काय घडलं?, धक्कादायक कारण समोर...

अहिल्यानगर: महिला वनरक्षकावर हल्ला; फॉरेस्ट परिसरात काय घडलं?, धक्कादायक कारण समोर…

spot_img

Crime News : देहरे (ता. अहिल्यानगर) येथील वन (फॉरेस्ट) विभागाच्या परीक्षेत्रातील सर्वे नंबर 171 मध्ये बेकायदेशीर मुरूम उत्खनन करताना वन विभागाने केलेल्या कारवाईदरम्यान एका महिला वनरक्षकाला शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहरे वन परीक्षेत्र कार्यालयातील वनरक्षक राजश्री जगन्नाथ राऊत (वय 34) यांनी फिर्याद दिली आहे.

हर्षल शिंदे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. शिंगवे नाईक, ता अहिल्यानगर), अंकुश जाधव (पूर्ण नाव माहिती नाही, रा. देहरे, ता. अहिल्यानगर) व दोन अनोळखी व्यक्तींविरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी (27 एप्रिल) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास देहरे वन परीक्षेत्रात कार्यरत वनरक्षक राजश्री राऊत यांना गस्तीदरम्यान आढळून आले की, काही व्यक्ती बेकायदेशीररीत्या मुरूम उत्खनन करत आहे.

त्यावेळी त्यांनी त्या व्यक्तींकडे उत्खननाबाबत परवाना आहे का, याची विचारणा केली असता संशयित चौघांनी शिवीगाळ करत धक्काबुक्की केली व सरकारी कामात अडथळा आणला. त्यांनी एक क्रमांक नसलेला डंपर आणि एक क्रमांक नसलेला जेसीबी यांचा वापर करून मुरूम चोरी करत घटनास्थळावरून पळ काढला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, उपनिरीक्षक भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनरक्षक राजश्री राऊत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भालेराव करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मराठा आरक्षण; सरकारसमोर मोठं आव्हान; कोर्टात ‘या’ गोष्टी सिद्ध कराव्या लागणार

Maratha Reservation : तर मराठा सामाजासाठी एसईबीसीचा जो मध्यममार्ग सरकारने शोधला होता. त्याचावर वक्रदृष्टी...

विधानसभेतील गद्दारांना योग्य ती शिक्षा मिळणार; खा. लंके यांचे आगामी निवडणुकाबाबत मोठे वक्तव्य

पारनेर । नगर सहयाद्री स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार करत खासदार नीलेश...

शेवगाव, पाथर्डीतील मावा विक्रेत्यांवर छापे; ४ आरोपींना अटक

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यांमध्ये चालणाऱ्या बेकायदेशीर मावा व...

२६ गोवंशीय जनावरांची सुटका; पोलिसांनी ‘असा’ लावला सापळा, ३ आरोपींसह मुद्देमाल ताब्यात

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथून कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे आणलेल्या २६ गोवंशीय जनावरांची...