spot_img
अहमदनगरधारदार हत्याराने तरूणावर हल्ला! नगरसेवक विजू पठारे यांच्या ऑफीसवर नेमकं काय घडलं?

धारदार हत्याराने तरूणावर हल्ला! नगरसेवक विजू पठारे यांच्या ऑफीसवर नेमकं काय घडलं?

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
वेल्डिंगचे काम करण्यासाठी गेलेल्या तरूणाला जातीवाचक शिवीगाळ करून लाकडी दांडके, लोखंडी रॉड व धारदार हत्याराने मारहाण करत हल्ला केल्याची घटना घडली आहे. रणजीत देवराम वैरागर (वय 39 रा. लालटाकी, बारस्कर कॉलनी) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांनी उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरूनभाजप पदाधिकारी नीलेश सातपुते, राजेंद्र सातपुते, निखील सातपुते, महादेव सातपुते, अर्चना सातपुते, सुनीता सातपुते, गणेश कोतकर व नांगरे (पूर्ण नाव माहित नाही, सर्व रा. केडगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी वैरागर हे नगरसेवक विजू पठारे केडगाव लिंक रस्त्यावरील नगरसेवक विजू पठारे यांच्या ऑफीसवर वेल्डींगच्या कामासाठी गेले होते.
9 सप्टेंबर रोजी रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान फिर्यादी वेल्डींगचे काम करत असताना संशयित आरोपी लाकडी दांडके, लोखंडी रॉड, धारदार हत्यार घेऊन आले. ‘तू इथे कोणाला विचारून काम चालू केले, तुझे नाव काय आहे, असे विचारले असता फिर्यादीने मी नगरसेवक विजू पठारे यांच्याकडे काम चालू केल्याचे सांगितले. त्यानंतर संशयित आरोपीने फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ केली.

तुम्ही मला शिवीगाळ का करता, जे काही असेल ते मालक पठारे यांना सांगा’, असे फिर्यादीने सांगताच संशयित आरोपींनी फिर्यादीला मारहाण केली. जातीवाचक शिवीगाळ करून धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपअधीक्षक अमोल भारती करत आहेत. दरम्यान, या घटनेत यापूर्वी सातपुते यांच्या फिर्यादीवरून विजय पठारे व इतरांवर गुन्हा दाखल झालेला आहे. घटनेनंतर 17 दिवसांनी विरोधी गटाची फिर्याद दाखल झाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांसाठी दिलासादायक बातमी!; ‘त्या’ यादीत आपले नाव आहे का? ते पाहा…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री;- नगर अर्बन बँकेत पाच लाखाहून अधिक रकमेच्या ठेवी अडकलेल्या ठेवीदारांना निम्मी...

आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी; ‘दो दिन के अंदर…’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार संग्राम जगताप यांना बुधवारी रात्री...

आजचे राशी भविष्य ! ‘या’ राशींसाठी ‘गुरुवार’ कसा? पहा..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते...

‘स्थानिक स्वराज्य’ संस्थांच्या निवडणुकीबाबत मंत्री विखे पाटलांचे महत्वाचे स्टेटमेंट; लवकरच..

स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका लवकरच; प्रदेशाध्यक्ष आ.चव्हाणांना दिल्या शुभेच्छा   शिर्डी । नगर सहयाद्री  पंतप्रधान नरेंद्र मोदी...