spot_img
अहमदनगरपारनेरमध्ये २४ जणांविरूध्द अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल! वाचा सविस्तर..

पारनेरमध्ये २४ जणांविरूध्द अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल! वाचा सविस्तर..

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री-
तालुक्यातील एका गावात खा. नीलेश लंके यांचे सहकारी राहुल झावरे याने साथीदारांच्या मदतीने महिलेच्या घरी जाऊन तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना गुरूवारी (६ जून) सकाळी घडली आहे.

दरम्यान, घाबरून पीडित महिलेने कुटुंबासह गाव सोडले. त्यांनी शुक्रवारी (७ जून) नगरमधील तोफखाना पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून राहुल झावरे सह २४ जणांविरूध्द विनयभंग, अ‍ॅट्रॉसिटी आदी कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहिती अशी: गुरूवारी दुपारी राहुल झावरे यांच्यावर १५ ते १६ जणांनी जीवघेणा हल्ला केला आहे. त्यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर नगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या जबाबावरून पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झावरे यांनी साथीदारांसह महिलेसोबत गैरवर्तन केल्यानंतरच त्यांच्यावर हल्ला झाल्याचे बोलले जात आहे.

फिर्यादी महिला पारनेर तालुक्यातील एका गावात कुटुंबासह राहतात. त्या गुरूवारी सकाळी घरासमोर उभ्या असताना साडेअकरा ते बाराच्या दरम्यान अचानक तीन ते चार चारचाकी वाहने त्यांच्या घरासमोर येऊन थांबली. त्यातून राहुल झावरे, प्रसाद नवले, अनिल गंधाक्ते, संदीप ठाणगे, राजु तराळ, महेंद्र गायकवाड, संदीप चौधरी, नंदु दळवी, किरण ठुबे, रामा तराळ, जितेश सरडे, कारभरी पोटघन, दादा शिंदे, बापू शिर्के, बाजीराव कारखिले, किशोर ठुबे, सचिन ठुबे, दीपक लंके, दत्ता ठाणगे, लखन ठाणगे, अक्षय चेडे, बंटी दाते, गंधाक्ते (पूर्ण नाव नाही), संदेश बबन झावरे (सर्व रा. पारनेर) उतरले.

झावरे याने फिर्यादीला उद्देशून जातीवाचक शिवीगाळ केली. नवरा कुठे आहे अशी विचारणा करून त्याला जिवंत ठेवणार नाही असे म्हणून मारहाण केली. ढकलून देऊन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. दीपक लंके, संदीप चौधरी यांनीही जातीवाचक शिवीगाळ केली. राजू तराळ, महेंद्र गायकवाड, संदीप चौधरी, नंदू दळवी, किरण ठुबे, रामा तराळ, जितेश सरड यांच्या हातात लोखंडी कोयते, लाकडी दांडके होते.दरम्यान, फिर्यादीने घाबरून नवरा घरात नसल्याचे सांगितले. त्यांच्या सासू सासऱ्यांनी विनंती करून देखील झावरे व त्याच्या साथीदारांनी शिवीगाळ केली व तेथून निघून गेले.

घाबरलेल्या पीडित फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाने झावरे व त्याच्या साथीदारांच्या भितीने गाव सोडून नगर गाठले. दुसऱ्या दिवशी तोफखाना पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून पुढील तपासकामी तो पारनेर पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...