Weather Update: बंगालच्या उपसागरात काही दिवसांपूर्वी धडकलेल्या फेंगल चक्रीवादळामुळं बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. यामुळे राज्यात जोरदार पावसानं हजेरी लावली. समुद्राचं तापमान कमी जास्त झाल्यानं तसेच चक्राकार वारे आणि तयार होणारा कमी दाबाचा पट्टा इशान्येकडे सरकला आहे.
दुसरीकडे उत्तरेकडील थंड प्रवाहाचा झोत राज्याच्या दिशेने असल्याने थंडी वाढली होती पण कमी दाबाचा पट्टा धडकल्यानं अरबी समुद्रात आर्दता निर्माण झाली आहे.याचाच परिणाम म्हणून राज्यात पावसाला पोषक स्थिती तयार झाली आहे. परिणामी राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. जोरदार पावसासह काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 26-28 डिसेंबरदरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे. 27 डिसेंबरला वादळी पावसासह गारपीटीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, हवामान विभागाने धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, नगर,जळगाव,धुळे, नंदूरबार,छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी,बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.