spot_img
अहमदनगरविधानसभेची तुतारी फुंकली! शरद पवार यांची 'मोठी' गर्जना, काय-काय म्हणाले पहा...

विधानसभेची तुतारी फुंकली! शरद पवार यांची ‘मोठी’ गर्जना, काय-काय म्हणाले पहा…

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री:-
राज्यातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. आगामी विधानसभेसाठी महाविकास आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुंबईमध्ये महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राला संकटातून सोडवायचं आहे, असे म्हणत विधानसभेची तुतारी फुंकली.

यावेळी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.प्रत्येक नेत्याने महाराष्ट्रात परिवर्तन करण्यासाठी काय करायची गरज आहे याचं मार्गदर्शन केले. अजूनही देशावरच संकट पूर्ण गेलं असा निष्कर्ष काढता येणार नाही. लोकसभेत काही प्रमाणात यश आलं पण संविधानावरील संकट पूर्ण गेलं असं निष्कर्ष काढता काम नये, कारण अद्यापही देशाची सूत्र त्यांच्याकडे आहेत, असे म्हणत शरद पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

अधिवेशनात देशाचे प्रधानमंत्री एकदाही संसदेत आले नाहीत. संसदेच्या महत्त्वाच्या कामकाजाकडे ढुंकूनही पाहिले नाही याची प्रचिती आली. पंतप्रधानांनी १५ ऑगस्टला विरोधीपक्ष नेते राहुल गांधींना मागच्या ओळीत बसवले होते. मी देखील विरोधीपक्ष नेता होतो, मनमोहन सिंह पंतप्रधान असताना सुषमा स्वराज विरोधी पक्ष नेत्या होत्या त्या पहिल्या ओळीत त्या बसल्या होत्या. केंद्र सरकारकडून मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधींचा मान राखला गेला नाही, त्यामुळे आपण जागरुक राहण्याची गरज आहे, असं शरद पवार म्हणाले.

दोन महिन्यात निवडणुका आहे. त्याहीपेक्षा दिवस कमी आहेत. तिन्ही पक्ष आणि इतर पक्षांनी लोकांमध्ये जाऊन परिवर्तनाचा विचार त्यांच्या मध्ये रुजवायला पाहिजे, चुकीच्या लोकांच्या हातून सत्ता काढायला हवी. यांच्या चुकीच्या कारभाराची अनेक उदाहरणे देता येतील. निवडणुकीला सगळ्यांना एकत्र घेऊन एकजुटीने समोर जायचे आहे. आमच्या सगळ्यांच्या कडून प्रयत्न केले जातील त्यात तुमची साथ हवी, कष्ट करण्याची तयारी ठेवा, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

आधी जागा ठरवा मग पुढे जाऊ; ठाकरे
मुंबईत महाविकास आघाडीचा महामेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी उद्धव ठाकरेंनी संवाद साधला आहे. उद्धव ठाकरेंनी निवडणूक, जागावाटप अशा मुद्द्यांवर भाष्य केले आहे. यावेळी बोलताना मविआचा मुख्यमंत्री चेहरा म्हणून काँग्रेस आणि शरद पवार गटाने जाहीर केलेल्या कोणत्याही उमेदवाराला मी पाठिंबा देऊ असे उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सांगितले. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही राज्याचा स्वाभिमान जपण्याची लढत असेल. मी खुर्चीसाठी नाही लढत. महायुतीत असताना ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असं आहे. त्यामुळे एकमेकांच्या जागा पाडण्यात व्यस्त राहू नका. मात्र आपण पुढे जाताना आधी जागा ठरवा, मग पुढे जाऊ. जागेसाठी मारामार्‍या करु नका, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच मुख्यमंत्री चेहरा ठरवा मग पुढे जाऊया, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बाउन्सरची दहशत मोडून काढणार ‘राऊळबुवा’!

दाखवायचं कोणाला आणि झाकायचं कोणाचं ? एक कुटुंब महिन्याला कर्मचार्‍यांचे पगार तर दुसरे कुटुंब...

Accident News: बस-आयशरच्या भीषण अपघातानं शहर हादरलं; एकाचवेळी सहा ठार, कुठे घडली घटना?

Accident News: वडीगोद्री मार्गावरील शहापूर जवळील वळणावर बस आणि संत्रा वाहतूक करणार्‍या आयशरचा भीषण...

Ahmednagar News: अहमदनगरमध्ये हॉटेल व्यावसायिकावर तलवारीने हल्ला? हैराण करणार कारण आलं समोर..

अहमदनगर | नगर सह्याद्री:- गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत २ गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये डी जे मागे...

Politics News: लाडका दाजी बिबट्याच्या दहशतीखाली! आ. तनपुरेचे गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर..

Politics News: निवडणुकीच्या तोंडावर निळवंडे धरण कालव्यांची कामे थातूरमातूर कले आहे. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)...