spot_img
ब्रेकिंगविधानसभेचा प्लान फिस्कटला! 29 ऑगस्टची बैठक स्थगित; मनोज जरांगे पाटील नेमकं काय...

विधानसभेचा प्लान फिस्कटला! 29 ऑगस्टची बैठक स्थगित; मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले? पहा

spot_img

Manoj Jarange Patil: सरकारने आरक्षण दिलं नाही तर विधानसभा निवडणूक लढवणार अशी घोषणा काही दिवसांपूर्वी करणारे मनोज जरांगेंनी अचानक आपली रणनीती बदलली आहे. अंतरवाली सराटी येथे होणारी (ता. 29) रोजीची नियोजित बैठक स्थगित करण्यात आली आहे.

सरकारने विधानसभेच्या निवडणुका चार महिने पुढे ढकलल्या आहेत. राज्यात कोणती आपत्ती नाही किंवा मोठे असे कारण नाही, तरीही काही कारण नसताना विधानसभा निवडणूक चार महिने पुढे ढकल्यामुळे विधानसभेच्या रणनीतीमध्ये बदल केल्याची माहिती मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मनोज जरांगे म्हणाले, अंतरवाली सराटी येथील लाठीचार्ज, बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार, लाठी हल्ला, राज्यात मराठा समाज, धनगर समाजाचे आरक्षणाकरिता होत असलेले आंदोलन, मोठे समाज सत्ताधारी सरकारच्या विरोधात आहेत. या घटनांची सत्ताधारी सरकारला भीती वाटत आहे, त्यामुळे सरकारने भीतीपोटी आणि निवडणुकीमध्ये फटका बसणार या कारणाने निवडणूक पुढे ढकलली आहे.

अंतरवाली सराटीत ता. 29 रोजी विधानसभा निवडणूक लढ्याची का समोरचे पाडायचे याबाबत निर्णय घेण्यात येणार होता. परंतु, सरकार आमच्या निर्णयाची वाट पाहत होते. आमची रणनिती त्यांना कळू नये, त्यांचे डाव यशस्वी होऊ नये म्हणून आम्ही पण निवडणूक लांबली असल्याने ता. 29 रोजी आमचा निर्णय जाहीर करणार नाही असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राज्यात कुठे-कुठे फेरमतमोजणी? निवडणुक आयोगाकडून कुणाला मिळाला दिलासा…

नाशिक | नगर सह्याद्री:- राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. मात्र विरोधकांकडून ईव्हीएम...

अहिल्यानगर: बसस्थानक परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा! कापड बाजारातील अतिक्रमण हटणार का?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर शहरातील माळीवाडा बसस्थानक व पुणे बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात झालेल्या...

महाआघाडीत बिघाडी! ठाकरे गट महापालिकेला स्वबळावर लढवणार?

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारून महाविकास आघाडीला धूर चारत...

थंडीने अहिल्यानगर गारठले! वाचा, हवामान विभागाचा अंदाज

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांत तापमानाचा घसरला आहे. त्यामुळे नागरिक चांगलेच गारठले...