spot_img
देशविधानसभेचे बिगुल वाजला! 'या' तारखेला होणार मतदान? निकाल कधी लागणार? वाचा, निवडणूक...

विधानसभेचे बिगुल वाजला! ‘या’ तारखेला होणार मतदान? निकाल कधी लागणार? वाचा, निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची माहिती एका क्लिकवर..

spot_img

Vidhansabha Election 2024: लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील जनतेचे लक्ष महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांकडे लागले होते. अखेर आज राज्यातील विधानसभा निवडणुकीची प्रतीक्षा संपली असून विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. आज पासून महाराष्ट्रासह- झारखंडमध्ये आचारसंहितेस प्रारंभ झाला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी २० नोहेंबरला मतदान तर २३ नोहेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार शर्मा यांनी केली आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरला संपणार होती. त्यापूर्वी राज्यात नवी विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक आहे, त्यानुसार (१५ ऑक्टोबर) दुपारी ३.३० वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद आयोजित केली होती. पत्रकार परिषदेच्या सुरवातीला मुख्य आयुक्त राजीव कुमार शर्मा यांनी हरियाना आणि जम्मू काश्मिर मधील मतदारांचे आभार मानले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबर महिन्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष, अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रात एकूण 9.63 कोटी मतदार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. त्यामधील 234 जागा या सर्वधाराण उमेदवारांसाठी तर एसटी प्रवर्गासाठी 25 तर 29 जागा या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. तसेच ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना घरबसल्या मतदान करण्यात येणार आहे. त्यासाठी आर्ज करावा लागणार आहे.

महाराष्ट्रात राज्यातील विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार आहे. दिवाळी आणि छट पुजा लक्षात घेऊनच निवडणूक आयोग तारखा निश्चित केल्या आहे. २० नोहेंबरला मतदान तर २३ नोहेंबरला निकाल लागणार आहे. राज्यातील सर्वच पक्षांनी या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. राज्यात सहा मोठे पक्ष या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांप्रमाणेच महाराष्ट्रातील जनताही या निवडणुकीकडे बारीक लक्ष ठेवून आहे.

सगळ्या मतदानाची व्हिडिओग्रफी केली जाईल. मतदानाचा टक्का वाढण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त करण्यात येईल. त्यासाठी वेगवेगळे मोबाईल अॅप उपलब्ध आहेत. ज्यांच्या नावावर क्रिमिनल रेकॉर्ड असेल, त्या उमेदवारांना पेपरमधे ३ वेळा जाहीरात द्यावी लागेल. सामान्य नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. २ किलोमीटरच्या आत मतदान केंद्र असेल.सगळ्या मतदानाची व्हिडिओग्रफी केली जाईल. मतदानाचा टक्का वाढण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त करण्यात येईल. त्यासाठी वेगवेगळे मोबाईल अॅप उपलब्ध आहेत. ज्यांच्या नावावर क्रिमिनल रेकॉर्ड असेल, त्या उमेदवारांना पेपरमधे ३ वेळा जाहीरात द्यावी लागेल. सामान्य नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. २ किलोमीटरच्या आत मतदान केंद्र असेल.

महाराष्ट्राच्या निवडणुकीचं वेळापत्रक
निवडणुकीचं नोटिफिकेशन : २२ ऑक्टोबर २०२४
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : २९ ऑक्टोबर
अर्जांची तपासणी : ३० ऑक्टोबर २०२४
अर्ज मागं घेण्याची तारीख : ४ नोव्हेंबर
मतदान : २० नोव्हेंबर २०२४
मतमोजणी : २३ नोव्हेंबर २०२४

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...