spot_img
ब्रेकिंगविधानसभा लांबणीवर!; नोव्हेंबर कि डिसेंबर? काय आहे अंदाज पहा..

विधानसभा लांबणीवर!; नोव्हेंबर कि डिसेंबर? काय आहे अंदाज पहा..

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री

केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या दोन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुकीची घोषणा शुक्रवारी केली. गेल्या तीन निवडणुकांत हरियाणा आणि महाराष्ट्रातील निवडणुकांची घोषणा एकाच वेळी झाली होती. पण, महाराष्ट्राची निवडणूक दिवाळीनंतर होण्याचे संकेत निवडणूक आयोगाने दिले आहेत. तरी, ही निवडणूक विधानसभेची मुदत संपल्यावर, अर्थात डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.शिंदे सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे निवडणूक लांबणीवर पडली असल्याचे सांगितले जात आहे. विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळे मुदतीपूर्वी विधानसभा अस्तित्वात न आल्यास राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. त्यानंतर डिसेंबरमध्ये विधानसभेची निवडणूक होऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

लोकसभेला जनतेने आस्मान दाखविल्यानंतर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीने पावले टाकली जात आहे. पुन्हा सत्तेत येण्यासाठी त्यातच मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना लागू केली आहे. त्याअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रूपये दिले जाऊ लागले आहेत. योजनेचे दोन हप्ते रक्षाबंधनाच्या पूर्वी महिलांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात आले.

पण, विधानसभेला महिला मतदारांची अधिकाधिक मते मिळवायची असतील, तर योजना जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याच्या कानाकोपर्‍यात मेळावे घेत आहेत. त्यासह योजनेचे आणखी किमान दोन-तीन हप्ते तरी महिलांच्या बँक खात्यात जमा होणे आवश्यक आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हिंदू संकृतीला डळमळीत करणार्‍या वोकिझम संकटाला समजून घ्या; शिवशंभू व्याख्याते नीलेश भिसे

उत्कृष्ट आरास स्पर्धेत सिद्धेश्वर तरुण मंडळ व समर्थ युवा प्रतिष्ठान प्रथम अहिल्यानगर | नगर सह्याद्री आता...

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पाणीपुरीवाल्याला मारहाण, नगरमध्ये ‘येथे’ घडला प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील दिल्लीगेट परिसरात पाणीपुरी विक्रेत्याने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग...

चास घाटात दरोडा!; ‘ती’ टोळी पकडली

चास घाटाजवळील घटना; सात लाख ९० हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे...

धक्कादायक! नाशिकमध्ये गावगुंडांकडून पत्रकारांना बेदम मारहाण

नाशिक / नगर सह्याद्री - नाशिकमध्ये पत्रकारांना गावगुंडानी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर...