spot_img
अहमदनगरबदनामी करण्याची धमकी देत तरूणीवर अत्याचार; कुठे घडला प्रकार आणि कोण आहे...

बदनामी करण्याची धमकी देत तरूणीवर अत्याचार; कुठे घडला प्रकार आणि कोण आहे आरोपी…

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
बदनामी करण्याची धमकी देत तरूणीवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील एका उपनगरात राहत असलेल्या पीडित तरूणीने या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार करणार्‍या तरूणाविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल सुखदेव दिवटे (वय 34 रा. जय भवानी चौक, निंबळक, ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे.

दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. सदरची घटना जानेवारी 2018 ते ऑगस्ट 2024 पर्यंत नवनागापूर व केडगाव उपनगरात वेळोवेळी घडली आहे. पीडित तरूणीने 12 डिसेंबर 2024 रोजी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. अनिल दिवटे याची फिर्यादी तरूणीसोबत ओळख झाल्यानंतर त्याने सुरूवातीला जानेवारी 2018 मध्ये तिच्यासोबत बळजबरीने शारीरीक संबंध केले होते.

सदर प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले तर मी तुझी बदनामी करेल तसेच जीवे मारेल अशी धमकी दिली होती. त्यानंतर अनिलने वारंवार बदनामी करण्याची धमकी देत फिर्यादीसोबत जानेवारी 2018 ते ऑगस्ट 2024 पर्यंत बळजबरीने शारीरीक संबंध केले. तसेच फिर्यादीने त्याला विरोध केला असता तिला शिवीगाळ करून मारहाण केली होती, असे फिर्यादीत नमूद केलेले आहे.

दरम्यान, हा सर्व प्रकार फिर्यादीने 12 डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलिसांना सांगितला. पोलिसांनी पीडिताच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....