spot_img
अहमदनगरअल्पवयीन मुलावर धारदार शस्राने सपासप वार!; बारातोंटी कारंजा जवळ नेमकं काय घडलं?

अल्पवयीन मुलावर धारदार शस्राने सपासप वार!; बारातोंटी कारंजा जवळ नेमकं काय घडलं?

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
तिघांनी अल्पवयीन मुलावर (वय 17) धारदार वस्तूने वार करून त्याला जखमी केले. जखमी मुलावर येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान त्याने दिलेल्या जबाबावरून तिघांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख आसद अख्तर, शेख उनेस आबीद व शेख अख्तर महेबूब (सर्व रा. खाटीक गल्ली, जुना मंगळवार बाजार) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सदरची घटना शुक्रवारी (18 ऑक्टोबर) दुपारी साडेबाराच्या सुमारास ब्राम्हणगल्ली, बारातोंटी कारंजा जवळ घडली. फिर्यादी हा त्याच्या आजोबाच्या गोळ्या आणण्यासाठी मेडिकलमध्ये पायी जात असताना तिघांनी त्याला दुचाकी आडवी लावली.

शिवीगाळ केली असता त्याने शिव्या का देता, मला का अडवले अशी विचारणा केली असता त्याचा त्यांना राग आला. रागातून आसद याने धारदार वस्तूने फिर्यादीवर चार ठिकाणी वार करून जखमी केले. जखमी फिर्यादी खाली कोसळताच ते तिघे घटनास्थळावरून पसार झाले. फिर्यादीला त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीने रूग्णालयात नेले. त्याने उपचारादरम्यान पोलिसांना जबाब दिला आहे.

दरम्यान, घटना घडल्यानंतर शेख अख्तर महेबूब हा फिर्यादीच्या घरी गेला व आमच्यावरती कंम्प्लेट करू नका असे म्हणून महिलांना शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेर राजकीय कुस्त्या लावण्यासाठी माहीर ; डॉ. सुजय विखे पाटील नेमकं काय म्हणाले पहा…

  बाबासाहेब तांबे सोशल फाउंडेशनच्या आखाड्याचा जिल्ह्यात नावलौकिक पारनेर | नगर सह्याद्री अंबिका माता यात्रा उत्सवा निमित्ताने...

रंजित कासले प्रकरणात मोठं ट्विस्ट; ‘त्या’ 10 लाख रुपयांबाबत धक्कादायक खुलासा, अडचणीत वाढ

बीड / नगर सह्याद्री मोठी बातमी समोर येत आहे, निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले...

पावसाचा पहिला अंदाज आला! राज्यात ‘या’ तारखेला कोसळणार?

Weather Update: -भारतीय हवामान विभागाने २०२५ च्या मान्सून २०२५ च्या हंगामासाठीचा आपला अंदाज जाहीर...

‘राष्ट्रवादीचे सभासद नोंदणीतून बळ वाढणार’; टाकळी ढोकेश्वर गटातून अभियानाला सुरुवात

पारनेर | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानाला पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जिल्हा...