spot_img
अहमदनगरAhmednagar Crime News: सराईत गुन्हेगाराला 'अशा' ठोकल्या बेड्या

Ahmednagar Crime News: सराईत गुन्हेगाराला ‘अशा’ ठोकल्या बेड्या

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
एमआयडीसी व तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत दहशत करणारा व नऊ गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला वाईन शॉपी समोर येताच तोफखाना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. करण खंडू पाचारणे (रा. बोल्हेगाव) असे त्याचे नाव आहे.

एमआयडीसीतील राहुल वाईन शॉपी समोर पोलिसांनी शनिवारी (८ जून) रात्री ही कारवाई केली.पाचरणे विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात चार व एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाच असे एकुण नऊ गंभीर गुन्हे दाखल आहे. दोन महिन्यापूर्वी तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या मारहाणीच्या गुन्ह्यात तो पसार होता. त्याचा शोध पोलीस घेत असताना तो एमआयडीसीतील राहुल वाईन शॉपी समोर येणार असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती.

पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शैलेश पाटील, पोलीस अंमलदार दत्तात्रय जपे, सुनील शिरसाठ, अहमद इनामदार, दिनेश मोरे, भानुदास खेडकर, संदीप धामणे, वसिम पठाण, सुमीत गवळी, सतिष त्रिभुवन, शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर, सतिष भवर, बाळासाहेब भापसे यांच्या पथकाने राहुल वाईन शॉपी परिसरात सापळा लावून पाचरणेला ताब्यात घेतले. त्याला अटक करण्यात आली असून अधिक तपास महिला पोलीस अंमलदार प्रमिला गायकवाड करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सामान्यांचा आधारवड: आमदार अरुणकाका जगताप

अहिल्यानगर-  अरुणकाका आमदार अरुणकाका म्हणजे सामान्य जनतेचा आधारवड. गरिबांवरील अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा, गरीब आणि...

हवामान खात्याचा इशारा आला! नगर जिल्ह्याला ‘इतक्या’ दिवसाचा यलो अलर्ट

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा अजूनही कायम असून, हवामान विभागाने पुढील...

निष्ठावंतांचं केडर जपणारे काका पुन्हा होणे नाही!

काका म्हणाले होते, ‌‘जनतेचे आशीर्वाद अन्‌‍ प्रेम मला मिळाले, सचिन आणि संग्रामला माझ्या दुप्पट...

भारतीय सैन्याने पाकिस्तानचा बुरखा फाडला; वाचा, स्पेशल रिपोर्ट

कर्नल सोफिया कुरेशी | पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी...