spot_img
अहमदनगरकार्यकर्त्यांची फौज अन्‌‍ जीवाला जीव देणाऱ्या निष्ठावंतांचं केडर जपणारे 'अरुणकाका'

कार्यकर्त्यांची फौज अन्‌‍ जीवाला जीव देणाऱ्या निष्ठावंतांचं केडर जपणारे ‘अरुणकाका’

spot_img

सारिपाट / शिवाजी शिर्के
नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून कामकाज पाहिलेल्या अरुणकाका जगताप यांनी पुढे जाऊन काही काळ राजकीय विजनवास घेतला. मात्र, समाजकारणात ते कायम सक्रिय राहिले. मित्र जमवणे, जपणे आणि त्यांच्या मदतीला धावणारे काका अनेकांनी अनुभवले आणि आजही त्यांच्या या दिनचर्येत काहीच बदल नाही. थोरले चिरंजीव सचिन यांनी गावाकडची नाळ कायम जपली आणि त्यातूनच त्यांना जिल्हा परिषदेत सलग तीनदा संधी मिळाली. धाकटे चिरंजीव संग्राम यांनी शहरातील सवंगडी जपले आणि त्यांना सोबत घेत महापौर ते सलग तीनवेळा आमदार असा राजकीय प्रवास केला.

मात्र, मध्यंतरीच्या काळात विधान परिषदेसारख्या अत्यंत वरच्या सभागृहात सलग दोनवेळा आमदार म्हणून काम करण्याची संधी अरुणकाका यांना मिळाली. त्या संधीचे त्यांनी सोने केले. स्वत: नगराध्यक्ष राहिलेल्या अरुणकाका यांना दोनवेळा आमदारकी, चिरंजीव संग्राम यांना सलग तीनदा आमदारकी आणि सचिन यांना सलग तीनदा जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. हे सारं राजकीय वैभव उभे राहिले असतानाही अरुणकाका यांनी कधीही सामान्यांशी असणारी नाळ तुटू दिली नाही आणि तीच परंपरा सचिन आणि संग्राम या दोघांनीही कायम ठअनेक पुढारी- नेत्यांची मुले वाईट संगतीने त्यांची वाट चुकली मात्र, अरुणकाका त्याबाबत समाधानी राहिलेत! शिवाजीराव, पांडुरंगाची सेवा करत आलो आणि जे पाहिजे ते मला मिळत गेले. दोन्ही मुले- सुना संस्कारी निघाल्यात आणि समाजाची सेवा करताहेत, यातच मी समाधानी असल्याचे आमच्या सोबत चहा घेता- घेता सांगणारे काका त्यामुळेच तर आजही अजातशत्रू म्हणून ओळखले जात आहेत. स्वत:सह त्यांच्या दोन्ही मुलांकडे आपल्या कार्यकर्त्यांची फौज आहेच तसेच जीवाला जीव देणाऱ्या निष्ठावंतांचं केडर आहे. म्हणूनच तर आज नगर शहर म्हणजे जगताप परिवार हे समीकरण आहे.

जगताप परिवाराला राजकारणात अनेक विरोधक आहेत पण त्यांनी त्यांचा कधी दुस्वास केला नाही. मात्र जर कोणी अंगावर आले तर त्यांना कधी सोडलेही नाही. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर संग्राम जगताप यांनी थेट हिरव्या गुलालाला हात घातला अन्‌‍ भगव्याशी पाईक असल्याचे ठासून सांगितले. संग्राम जगताप यांची ही भूमिका मारक ठरु शकते असे अरुणकाकांना मी सहज बोललो. मात्र, त्यावर अरुणकाकांनी अत्यंत शांत अन्‌‍ संयमी स्मीत करत दिलेले उत्तर हे वडिलकीचा आदर्श देणारेच होते. ‌‘शिवाजीराव, संग्राम आता निर्णय घ्यायला मोकळा झालाय! तीन वेळा नगरकरांनी त्याला विधानसभेत पाठवलेय. त्याला चांगलं काय आणि वाईट काय हे आता कळू लागलंय! त्याचे निर्णय चुकणार नाहीत‌’. काळ सरला अन्‌‍ संग्राम जगताप यांना त्याच हिंदुत्वाच्या मुद्यावर संपूर्ण जिल्हाभरातून मागणी होऊ लागली. मढीची होळी, श्रीरामपूरचा जातीय तणाव, कर्जतमधील घटना या घटना ठळक दिसत असल्या तरी पडद्याआड हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेणाऱ्या संग्राम जगताप यांना अनेकांनी पाहिले अन्‌‍ अनुभवले! शिवाजीराव, पद मिरवण्यासाठी नसते. काम करण्यासाठी असते. जनतेचे आशीर्वाद मी घेतले अन्‌‍ तेच आशिर्वाद जनता आता सचिन आणि संग्रामला देत आहे. यापेक्षा एका बापाला वेगळे समाधान ते काय असते, असं बोलताना अरुणकाकांच्या चेहऱ्यावर समाधानाच्या निर्माण झालेल्या भावना बऱ्याच बोलक्या होत्या. जिल्ह्याचाच विचार केला तर अनेक नेते- पुढाऱ्यांचं पुढारपण त्यांच्या वाया गेलेल्या पोरांमुळेच गेले हे सांगण्याची गरज नाही. मात्र, काका त्याला अपवाद ठरले. ‌‘आपण कोणाचं वाईट केलं नाही, परमेश्वर माझं वाईट करणार नाही‌’, हे सांगताना काका कृतकत्य झाल्यासारखे अनेकदा दिसले.

अभ्यासू पण आक्रमक व्यक्तिमत्त्व असलेल्या सचिन आणि संग्राम यांच्यात अरुणकाकांचे गुण आहेत. त्यांची संग्राम जगताप यांची विधानसभेतील भाषणे ऐकताना काकांच्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिदतील भाषणांची आठवण होते. विरोधकाला आपलेसे करणारे आणि प्रसंगी त्याच्या घरी जाऊन त्याचाच पाहुणचार घेणाऱ्या काकांची तीच कार्यपद्धती सचिन आणि संग्राम या दोघांकडेही दिसते. विशेषत: जनसामान्यांच्या प्रश्नांची मांडणी करताना वास्तव मांडून सरकारचे लक्ष वेधून घेण्याची वेगळी खासियत संग्राम जगताप यांनी अलिकडे विकसीत केल्याचे दिसते. सर्वपक्षीय मित्र परिवार आणि राजकारण्यांशी, नेत्यांशी अरुणकाका यांनी कायमच मित्रत्वाचे संबंध जपले. विशेषत: विधान परिषदेत दोनदा संधी मिळाल्यानंतर नगर शहरापुरते मर्यादीत आणि सिमीत राहिलेले अरुणकाका यांनी राज्यभरात अनेक दिग्गजांचा गोतावळा तयार केला. त्याच गोतावळ्यात रमताना कुटुंबात कणखर कुटुंबप्रमुख दिसणारे अरुणकाका प्रत्यक्षात हळवे आहेत. राजकारणात मुलं मोठ्या पदावर गेली असली तरी सचिन आणि संग्राम या दोघांशीही त्यांचा असणारा संवाद आणि दोघांशीही मुलापेक्षा मित्रत्वासारखे वागणारे अरुणकाका अनेकांनी पाहिले.

नगर शहराच्या राजकीय जडणघडणीचा, राजकीय पक्ष आणि त्या पक्षांच्या असित्वाचा विचार केला तर आज अरुणकाका हे अजित पवार यांच्या गोटात दिसत असले तरी त्यांचा स्वत:चाच एक राजकीय विचार आहे आणि तोच त्यांचा पक्ष! अनेक राजकीय पक्ष आणि त्यांचे पदाधिकारी नगरमध्ये आहेत. त्यांचे अस्तित्वही आहे. मात्र, अरुणकाका जगताप ह्या विचाराचा, त्यांचे समर्थन करणारा वेगळा परिवार नगरमध्ये निर्माण झाला आहे. शंभरपैकी सत्तरजणांकडून अरुणकाका जगताप हाच आमचा राजकीय पक्ष असे उत्तर मिळत असेल तर याचा अर्थ काकांनी नगर शहरात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केलेय आणि त्याच्या सोबतीने कष्ट घेतले आणि घेत आहेत ते संग्रामभैय्या!अरुणकाका कुणाच्या पुढे पुढे करताना दिसले नाहीत आणि त्यांना तसे करणे कधी जमलेही नाही. स्वत: शरद पवार तर पक्षाच्या कार्यक्रमात अनेकदा अरुणकाकांना हाक मारून पुढे बोलावताना दिसले. खरेतर असे अनेकदा घडले आहे. स्वत:चा आब राखून ते काम करताना मी त्यांना लोकमत, देशदूत आणि आता नगर सह्याद्री या प्रवासात अनुभवले आणि पाहिले.

भेटायला आलेल्या लोकांचे ते प्रश्न समजावून घेतात. दुसऱ्याशी नेहमी ते आदराने बोलतात. शिवसेनेचे तत्कालीन उपनेते स्व. अनिल राठोड यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी याच अरुणकाकांनी चितळे रस्त्यावर धाव घेतली तेव्हा संपूर्ण नगर शहरालाच नव्हे तर जिल्ह्याला अरुणकाकांचे अँग्री यंग मॅन असे दर्शन घडले होते. नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार असा राजकीय प्रवास केल्यानंतरही काकांचे पाय कायमच जमिनीवर राहिलेत! जनतेशी असणारी नाळ त्यांनी जशी कधीच तुटू दिली नाही तशीच त्यांनी पंढरपूरची वारी देखील कधीच चुकवली नाही. आमदारकी, खासदारकीच्या पलिकडे आज काका गेले आहेत. काकांच्या सोबतीला कार्यकर्त्यांची आजही प्रचंड मोठी फौज आहे आणि आजही जीवाला जीव देणाऱ्या निष्ठावंतांचं केडर त्यांच्या सोबत आहे. सचिन आणि संग्राम या दोघा बंधूंनी काकांच्या या फौजेत आणखी भर टाकतानाच जीवाला जीव देणाऱ्या निष्ठावंत तरुणांचं केडर देखील वाढवलं. काका, खरंच तुम्ही भाग्यवान आहात! समाधानाचा ढेकर ज्याला म्हणतात तो हाच! दैनिक नगर सह्याद्री परिवाराच्या वतीने काकांना वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा!

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कान्हूर पठारच्या शिक्षक प्रकरणात माझा संबंध नाही; कोण म्हणाले पहा…

पारनेर | नगर सह्याद्री कान्हूरपठार येथील वादग्रस्त शिक्षक प्रकरण हे सुमारे एक वर्षांपूर्वीचे आहे. त्याच...

बनावट प्रमाणपत्र तयार करून साडे सोळा लाख रुपये लाटले, नगरमध्ये घडला प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील एका चार्टर्ड अकाउंटंटच्या सही व शिक्क्यांचा वापर करून बनावट प्रमाणपत्र...

महापालिकेत गैरप्रकार, आमदार संग्राम जगताप आक्रमक, फायली अडविल्या तर…

आमदार संग्राम जगताप यांचा इशारा; अधिकार्‍यांच्या बैठकीत नगररचना विभागाच्या अनागोंदीबद्दल तक्रारींचा पाऊस अहिल्यानगर | नगर...

उड्डाणपुलाच्या पिलरवर पोस्टर लावणे भोवले, महापालिका आक्रमक, घेतली ही भूमिका

विनापरवाना फलक, पोस्टर्स तत्काळ काढून घ्यावेत, आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचे आदेश अहिल्यानगर...