spot_img
ब्रेकिंगहल्लेखोरालाच अटक की आरोपीवरून नाटक?; 'या' प्रकरणात मोठा ट्विस्ट...

हल्लेखोरालाच अटक की आरोपीवरून नाटक?; ‘या’ प्रकरणात मोठा ट्विस्ट…

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:
सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट निर्माण झालाय. सीसीटीव्हीतला हल्लेखोर आणि अटक करण्यात आलेला आरोपी एकच नसल्याचा धक्कादायक दावा करण्यात आलाय. कुणी केलाय हा दावा आणि काय आहे नेमकं सत्य काय?

हल्लेखोर आरोपीचे सीसीटिव्ही समोर आले आणि आणि आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथक रवाना झाली. मोठा गाजावाजा करत पोलिसांनी 2 दिवसांनी अगदी फिल्मी स्टाईलनं ठाण्यातून आरोपी बेड्या ठोकल्या. आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लामला अटक केल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.

मात्र सैफच्या घरातून बाहेर पडतानाच्या सीसीटीव्हीतला हल्लेखोर आणि पोलिसांनी अटक केलेला आरोपी हे दोघे वेगवेगळे असल्याचा दावा करण्यात आलाय. अटकेत असलेल्या बांग्लादेशी आरोपीचे वडील रुहेल अमीन फकीर यांनी केलेल्या दाव्यामुळे या प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.

दाव्यामुळे प्रश्नचिन्ह
आरोपीच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या बचावासाठी असा दावा केल्याचं गृहीत जरी धरलं तरी राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्यामुळे पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. सैफवर खरंच हल्ला झाला का? असा सावलच त्यांनी केलाय. य़ामुळे मात्र भाजपवर सारवासारव करण्याची वेळ आलीआहे. तसेच जर सीसीटीव्हीतला हल्लेखोर आणि अटकेत असलेला आरोपी या दोन वेगवेगळ्या व्यक्ती नसतील तर पोलिसांवर मोठी नामुष्की ओढवणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर पारनेरमध्ये उलथापालथ; उपमुख्यमंत्री पारनेरमध्ये; कोण कोण करणार प्रवेश पहा

पदाधिकार्‍यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती | सुजित झावरे पाटील यांचा शिवसेत पक्षप्रवेश पारनेर / नगर...

किरण काळे यांचे आरोप बिनबुडाचे, निराधार; जैन मंदिर ट्रस्ट अध्यक्ष सुभाष मुथ्था काय म्हणाले पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगरमधील जैन मंदिर ट्रस्टची जागा हडपल्याचा उबाठाचे किरण काळे यांनी केलेला...

अतिवृष्टीचा केंद्रीय पथकाने घेतला आढावा, कुठे केली पाहणी पहा

ग्रामस्थांशी संवाद साधून नुकसानीचा घेतला सविस्तर आढावा अहिल्यानगर / नगर सह्याद्री जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या...

सोलर पॅनल बसवण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांना पावणेतीन लाखांचा गंडा;

माजी सैनिकाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री 'प्रधानमंत्री सूर्य घर योजने'अंतर्गत सोलर पॅनल...