spot_img
ब्रेकिंगपुन्हा वाद पेटला! शिवसैनिकांना पोलिसांनी घेतले ताब्यात; कारण काय?

पुन्हा वाद पेटला! शिवसैनिकांना पोलिसांनी घेतले ताब्यात; कारण काय?

spot_img

Today News: कर्नाटक सरकारचे बेळगावात अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. यानिमित्ताने महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्याचे आयोजन केले होते. हा महामेळावा दडपण्याचा प्रयत्न बेळगावमध्ये कर्नाटक पोलिसांकडून झाला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अनेक कार्यकर्त्यांना बेळगाव सीमेवरच अडवले गेले. अनेकांना ताब्यात घेण्यात आले. तसेच महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेश नाकारला. बंदी असतानाही नेते बेळगावात आल्याने पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात बेळगाववर आपला दावा अधिक घट्ट करण्यासाठी कर्नाटक सरकार २००६ पासून बेळगावात विधिमंडळाचे अधिवेशन घेते. हे अधिवेशन बेकायदा असल्याचा आरोप करत महाराष्ट्र एकिकरण समितीने दरवेळेला महामेळावा आयोजित करून प्रत्युत्तर दिले आहे. यंदाही महाराष्ट्र एकिकरण समितीने महामेळाव्याचे आयोजन केले आहे.

या महामेळाव्यासाठी कोल्हापूर येथून ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक आज सोमवारी (दि.९) बेळगावच्या दिशेने चालले होते. दरम्यान, शिवसैनिकांना कोगनोळी येथील दुधगंगा नदीजवळ कर्नाटक पोलिसांनी रोखले. आम्हाला बेळगावात जायचे आहे. आम्हाला कोणी रोखू शकत नाही, असा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला. या शिवसैनिकांत संजय पवार, विजय देवणे, सुनील मोदी आणि इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे बेळगाव सीमेवर तणाव होता.

बेळगावात आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी आंदोलकांना फरफटत नेत ताब्यात घेतले. तर दुसऱ्या बाजूला कोल्हापुरात शिवसैनिकांनी कर्नाटकातून येणाऱ्या गाड्या अडवल्या. तर दुसऱ्या बाजूला कोल्हापुरात शिवसैनिकांनी कर्नाटकातून येणाऱ्या गाड्या अडवल्या. यामुळे महाराष्ट्र पोलिसांनी कोगनोळी टोल नाक्यावर कोल्हापुरातील शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहे. कर्नाटक पोलिसांनी कितीही दडपशाही केली तरी कोणत्याही परिस्थितीत आम्ही बेळगाव मध्ये जाणार, असा पवित्र शिवसेना उपनेते संजय पवार आणि विजय देवणे यांनी घेतला आहे.

सोमवारी सकाळी १० वाजता बाईक रॅली काढत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्ते बेळगावमध्ये दाखल झाले. बेळगावात आज कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून सीमाभागात देखील बंदोबस्तात वाढ करण्यात आलीय. त्यामुळे याठिकाणी आता वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. मराठी भाषिकांवर अन्यायाची परीसीमा सरकारने गाठली आहे. जोपर्यंत महाराष्ट्रात सामील होत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा कायम ठेवणार असल्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.

दरम्यान, कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाला विरोध करण्यासाठी म. ए. समितीने आयोजित केलेल्या महामेळाव्याची धास्ती घेत रविवारी (दि. ८) बेळगाव शहर पोलिस आयुक्तांनी शहरातील पाच ठिकाणी सोमवारी (दि.९) सकाळी ६ ते २० डिसेंबरच्या मध्यरात्री १२ पर्यंत जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. समितीचा महामेळावा होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून प्रचंड दडपशाही करण्यात येत असून, या विरोधात लोकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता कशासाठी थांबायचे?; पक्ष सोडण्यावर नगरसेवक, पदाधिकारी ठाम

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- विधानसभा निवडणुकीवेळी वारंवार मागणी करूनही पक्षाच्या वरिष्ठांनी, नेतृत्वाने आमची दाखल घेतली...

गरीब विक्रेत्यांना लक्ष्य करू नका; खा. नीलेश लंके यांचा इशारा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- शहरात महानगरपालिका अतिक्रमण मोहीम राबवत असून, रस्त्याच्या कडेला फळविक्री करणारे, हातगाडीवाले,...

निकृष्ट काम खपवून घेतले जाणार नाही; आमदार दातेंचा ठेकेदाराला इशारा

पारनेर | नगर सह्याद्री:- पारनेर जामगांव रस्त्याचे चालू असलेले काम अत्यंत संथ गतीने व निकृष्ट...

दिल्ली विधानसभेचा बिगुल वाजला; ५ फेब्रुवारीला मतदान अन निकाल…

निवडणूक आयुक्तांची घोषणा नवी दिल्ली / वृत्तसंस्था : नव्या वर्षात दिल्लीत निवडणूक होते आहे. दिल्लीत...