spot_img
अहमदनगरसात अधिकाऱ्यांची नियुक्ती; महिनाभरात अहवाल : आयुक्त यशवंत डांगे यांनी दिले आदेश..

सात अधिकाऱ्यांची नियुक्ती; महिनाभरात अहवाल : आयुक्त यशवंत डांगे यांनी दिले आदेश..

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी नियम, 2021 अंतर्गत राज्यातील नोंदणीकृत खाजगी रुग्णालयाची तपासणी करुन दैनंदिनी अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने दिले आहेत. महिनाभरात ही तपासणी पुर्ण करून त्याचा दैनंदिन अहवाल आरोग्य सेवा आयुक्तालयास सादर करावा, असे निर्देश आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला दिले आहेत. त्यानुसार सातही आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना या तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत.

खासगी रुग्णालयांकडून महाराष्ट्र शुश्रूषा गृह नोंदणी नियम, 2021 अंतर्गत नियमांचे काटेकोर पणे पालन होते किंवा नाही, याची खातरजमा या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्राधान्याने रुग्णालयामध्ये आकारण्यात येणा-या फी व इतर रुग्णालयीन सेवेचे शुल्क, दरपत्रक रुग्णालयाच्या दर्शनी भागांत लावण्यात यावे. तसेच महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी नियम, 2021 मधील अंतर्भूत रुग्ण हक्क संहिता रुग्णालयाच्या दर्शनी भागांत स्वच्छ अक्षरात लावण्यात यावी, असे निर्देश आहेत. याबाबत तसेच, रुग्णालयातील मंजूर खाटा व प्रत्यक्षात असलेल्या खाटा संख्या, अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र व फायर ऑडिट, जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट, नर्सिंग क्टची अंमलबजावणी आदींची महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात येणार आहे.

याबाबतची संपूर्ण कार्यवाही एक महिन्यांत पूर्ण करावयाची असल्याने दैनंदिन रुग्णालय तपासणीचा अहवाल करुन एकत्रित अहवाल आयुक्तालयास सादर करावा. यात सर्व नोंदणीकृत रुग्णालयांकडून महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी नियम 2021 मधील नियमांचे काटेकोरपणे पालन होते किंवा नाही याची खातरजमा करून स्पष्ट अहवाल द्यावा. आपल्या कार्यक्षेत्रातील दैनंदिन 2 ते 5 रुग्णालयांची तपासणी करून कार्यालयाकडे सादर करावा, अशा सूचना वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी तपासणीसाठी नियुक्त केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शहर हादरलं! पती-पत्नीचे आढळले मृतदेह, वाचा प्रकरण

संगमनेर । नगर सहयाद्री: उपनगरातील इंदिरानगर परिसरात पती-पत्नीचे मृतदेह आढळून आले. ही घटना रविवारी समोर...

धक्कादायक! फिर्यादीच निघाले आरोपी; विखेंचे बॅनर फाडणारे जेरबंद

शिर्डी । नगर सहयाद्री:- शहरातील लक्ष्मीनगर परिसरात माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे...

२१ वर्षांच्या नर्तिकेच्या नादात ३५ वर्षांचा नेता संपला!, कारमध्ये आढळला मृतदेह? शहरात खळबळ..

Maharashtra Crime News: मगळवारी सकाळी एका तरुणाचा कारमध्ये मृतदेह आढळून आला, ज्यामुळे परिसरात खळबळ...

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना खुशखबर! सरकार ऑगस्टचा हप्ता खटाखट जमा करणार, वाचा अपडेट..

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत एक...