spot_img
अहमदनगरअर्बन बँक प्रकरणात ट्विस्ट!! अटकपूर्व जामीनासाठी चार जणांचे अर्ज? अनपेक्षित नावामुळे बँकेच्या...

अर्बन बँक प्रकरणात ट्विस्ट!! अटकपूर्व जामीनासाठी चार जणांचे अर्ज? अनपेक्षित नावामुळे बँकेच्या वर्तुळात चर्चा

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
नगर अर्बन कर्ज घोटाळा प्रकरणी पुन्हा एक ट्विस्ट समोर आला आहे. फॉरेन्सिक ऑडिटमध्ये ठपका असलेल्या १०५ जणांची यादी लिक झाल्यानंतर अनेक संशयित पसार झाले आहेत. त्यातील काहींसह ज्यांची या यादीत नावे नाहीत अशांनीही अटकपूर्व जामीन अर्जासाठी न्यायालयात धाव घेतली असल्यामुळे बँकेच्या वर्तुळात चर्चा रंगली आहे.

नगर अर्बन बँके घोटाळा प्रकरणातील अटकेत असलेल्यांनी जामीनासाठी न्यायालयात अर्ज सादर केले आहेत. तसेच, या व्यतिरिक्त चार जणांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केले आहेत. यातील आठ जामीन अर्जावर आज (१ एप्रिल) व एका जामीन अर्जावर उद्या (२ एप्रिल) न्यायालयात सुनावणी होणार आहे.

अटकेत असलेल्या अमित वल्लभराय पंडित याच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. तर, राजेंद्र शांतीलाल लुनिया, प्रवीण सुरेश लहारे, अविनाश प्रभाकर वैकर यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे.

अनपेक्षित नावामुळे बँकेच्या वर्तुळात चर्चा
फॉरेन्सिक ऑडिटमध्ये ठपका असलेल्या १०५ जणांची यादी लिक झाल्यानंतर अनेक संशयित पसार झाले आहेत. त्यातील काहींसह ज्यांची या यादीत नावे नाहीत अशांनीही अटकपूर्व जामीन अर्जासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. कमलेश हस्तीमल गांधी, महादेव पंढरीनाथ साळवे, यज्ञेश बबन चव्हाण, देवेंद्र दिलीप गांधी, प्रगती देवेंद्र गांधी यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यावरही आज सुनावणी होणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...