spot_img
ब्रेकिंगअ‍ॅपल कंपनीचे सरप्राईज; आज iPhone 17 होणार लाँच; किंमत आणि फीचर्स जाणून...

अ‍ॅपल कंपनीचे सरप्राईज; आज iPhone 17 होणार लाँच; किंमत आणि फीचर्स जाणून घ्या…

spot_img

iPhone 17 Launch 2025 अ‍ॅपल कंपनीने ९ सप्टेंबर रोजी रात्री १०:३० वाजता iPhone 17 आणि iPhone 17 Pro सीरीजचे लाँचिग करणार आहे. यावेळी कंपनीकडून आयफोनसह नवीन एअरपॉड्स आणि अ‍ॅपल वॉच देखील बाजारात आणले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अ‍ॅपल कंपनीकडून चाहत्यांसाठी मिळणाऱ्या या नवा सरप्राईजकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आयफोन १७ प्रो ची किंमत यंदा वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेत कदाचित जवळपास १०० डॉलरने किंमत वाढणार असून एकूण किंमत १,०९९ डॉलर होण्याची शक्यता आहे. फायनान्शियल एक्सप्रेसने काही लिक्सवर आधारित आयफोन १७ च्या किंमतीचा अंदाज बांधला आहे. आयफोन १६ ची सुरुवातीची किंमत ७९९ डॉलर्स म्हणजे भारतामध्ये ७९,९९० रुपये होती. आता भारतात या नव्या मॉडेलची किंमत अंदाजे १,३०,००० रुपये असू शकते. मात्र उद्याच्या लाँचिंगनंतर आयफोन १७ सीरीजच्या किंमती आणि इतर वैशिष्ट्यांबद्दलची अधिकृत माहिती मिळेल.

आयफोन १७ लाइनअपमध्ये यूजर्सना अनेक नवे फिचर्स अनुभवायला मिळतील. यात Apple Intelligence, सुधारित फ्रंट कॅमेरा लेन्स, अधिक सामर्थ्यवान प्रोसेसर आणि iOS 26 संबंधी अपडेट्सचा समावेश असेल. कंपनीने यावेळी चार मॉडेल्स सादर करण्याची तयारी केली आहे. यात १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट डिस्प्ले, २४ एमपी फ्रंट कॅमेरा, मोठी बॅटरी आणि नवीन ॲपल इंटेलिजेंस फीचर्स आहेत.

आयफोन १७ प्लसच्या जागी आयफोन १७ एअर सादर केला जाऊ शकतो. हा एअर व्हर्जन अल्ट्रा थिन डिझाइनसह येईल, ज्यात स्लिम बॉडी आणि सिंगल रियर कॅमेरा असणार असल्याचे लीक झालेल्या रेंडर्समध्ये दिसून येत आहे. आयफोन १७ चे डिझाइन मागील आवृत्ती आयफोन १६ प्रमाणेच असेल. यात ६.३ इंचाचा १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले आणि २४ एमपी फ्रंट कॅमेरा असेल. या हँडसेटमध्ये A19 चिपसेटचा वापर होणार आहे. आयफोन १७ प्रोमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येणार आहे. या तिन्ही लेन्स ४८-४८ एमपी सेन्सर असलेल्या असतील.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे शुक्रवारी भूमिपूजन; आमदार कर्डिले यांची माहिती, कोण कोण राहणार उपस्थिती?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे भूमिपूजन येत्या शुक्रवार दिनांक 12...

विसर्जन मिरवणुकीत युवकाचा खून; कुठे घडली घटना?

सांगली । नगर सहयाद्री:- मिरज तालुक्यातील अंकली गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटांमध्ये सुरू...

बिबट्याच्या हल्ल्यातील कुटुंबीयांची खासदार नीलेश लंके यांनी घेतली भेट

पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील कळस गावात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या गणेश तुळशीराम...

दोन गटात राडा! शेतातला वाद पेटला पुढे नको तोच प्रकार घडला..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निमगाव वाघा शिवारात पाइपलाइनच्या किरकोळ वादातून दोन गटात राडा झाल्याची...