नगर सहयाद्री वेब टीम:-
बस प्रवास करताना प्रवाशांची गर्दी आणि त्यात होणारे संघर्ष हे नेहमीच चर्चेचे विषय असतात. पण एका व्हायरल व्हिडिओमुळे आता एक वयोवृद्ध आजोबा चर्चेचा केंद्रबिंदू बनले आहेत. सदरचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील ‘marathi_epic_jokes’ या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.
व्हिडिओमध्ये एक वयोरुद्धआजोबा बसच्या खिडकीत उभे असलेले दिसून येत आहेत. व्हिडिओ जस जसा तुम्ही पाहाल तर दिसेल की, खिडकीच्या येथे उभे असलेले आजोबा थेट खिडकीतून बसच्या आत जाण्याचा प्रयत्न करत आहेत. या आजोबांना बसच्या बाहेर असलेले अनेक व्यक्ती थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र ते आजोबा कोणाचही ऐकण्याचे नाव घेत नाही.
‘marathi_epic_jokes’
https://www.instagram.com/p/C_fKOpfsjfc/
व्हिडिओच्या पोस्ट झाल्यापासूनच याला हजारोंच्या घरात पसंती मिळाली आहे आणि लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत. यूजर्सनी या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया दिल्या असून काही नेटकऱ्यांनी हसण्याचे इमोजी वापरले आहेत, तर काहींनी आजोबांच्या कृत्याचे कौतुक केले आहे.व्हिडिओमधील घटना महाराष्ट्रातील कोणत्या शहरातील किंवा गावातील आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.