Politics News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. शरद पवार यांच्या 84 वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छा मिळत आहेत. शरद पवारांनी 85 व्या वर्षात पदार्पण केले आहे. दरम्यान दिल्लीमध्ये अचानक अजित पवार यांनी घरी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांच्यासोबत छगन भुजबळ, सुनील तटकरे, पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पात्र पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. अजितदादा यांच्या स्वागतासाठी सुप्रिया ताई उपस्थित होत्या.
सुप्रिया सुळे यांनी सर्व नेत्यांचे स्वागत केले. सर्वांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या. शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये अर्धा तास चर्चा झाली. या भेटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील राजकीय भूमिकेत काही बदल होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.