spot_img
ब्रेकिंगराज्यात पुन्हा सैराट! बहिणीच्या बॉयफ्रेंडला आई अन् भावाने संपवलं

राज्यात पुन्हा सैराट! बहिणीच्या बॉयफ्रेंडला आई अन् भावाने संपवलं

spot_img

पुणे । नगर सहयाद्री :-
पुण्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बहिणीच्या बॉयफ्रेंडचा भाऊ आणि आईने मिळून काटा काढला आहे. डोक्यावर फरशीने वार करून त्याची हत्या केली आहे. या गंभीर मारहाणीत तरूण जागीच बेशुद्ध होऊन पडला. त्याला गंभीर अवस्थेत तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योच मालवली. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव चौकशी करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

प्रदीप अडागळे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याचे ऋषी काकडेच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे ऋषी प्रदीपचा रागराग करत होता. दोघांमध्ये कायम टोकाची भांडणं होत. प्रदीप देखील ऋषीला शिवीगाळ देत असल्याची माहिती समोर आली आहे. याच रागातून ऋषी आणि त्याच्या आईने प्रदीपचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.

खुन्नस आणि राग यातून ऋषीने गुरूवारी रात्रीच्या सुमारास प्रदीपवर हल्ला चढवला. ऋषी आणि त्याची आई सविता तसेच मित्र शुभम मांढरे यांनी मिळून बहिणीच्या बॉयफ्रेंडला संपवलं. आधी मारहाण केली. नंतर फरशीच्या तुकड्याने डोक्यात वार करून हत्या केली. याचा व्हिडिओ देखील त्यांनी रेकॉर्ड केला. याच प्रदीप गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, उपचारापूर्वीच त्याचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तसेच काही तासांतच दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाचा पहिला अंदाज आला! राज्यात ‘या’ तारखेला कोसळणार?

Weather Update: -भारतीय हवामान विभागाने २०२५ च्या मान्सून २०२५ च्या हंगामासाठीचा आपला अंदाज जाहीर...

‘राष्ट्रवादीचे सभासद नोंदणीतून बळ वाढणार’; टाकळी ढोकेश्वर गटातून अभियानाला सुरुवात

पारनेर | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानाला पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जिल्हा...

ग्रामपंचायत अधिकारी पठाण यांच्यावर हल्ला! ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा काम बंदचा इशारा

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- राहुरी तालुक्यातील म्हैसगाव ग्रामपंचायत येथील ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती शकीला पठाण...

सूर्यदेव आग ओकतोय!, महाराष्ट्रातील ‘या’ भागात तापमान वाढणार..

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यात पुन्हा तापमान वाढायला सुरूवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून...