spot_img
अहमदनगरनगर जिल्ह्यातील एका सहकारी संस्थेत पून्हा 'इतक्या' लाखांचा अपहार!

नगर जिल्ह्यातील एका सहकारी संस्थेत पून्हा ‘इतक्या’ लाखांचा अपहार!

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी मधील मोहज देवढे येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेमध्ये 14 लाख 10 हजार 369 रुपयांचा अपहार झाल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. संस्थेचे तत्कालीन सचिव सुरेश दत्तात्रय देशमुख यांनी ही रक्कम वैयक्तिक फायद्यासाठी वापरल्याचे लेखापरीक्षणातून निष्पन्न झाले आहे.

हा अपहार 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2024 या कालावधीत करण्यात आला आहे. सचिव देशमुख यांनी सचिव पदाची जबाबदारी पार न पाडता, संस्थेचे विद्यमान संचालक मंडळ तसेच जिल्हा बँकेच्या शाखेला कोणतीही माहिती न देता व्यवहारातील मोठी रक्कम योजनाबद्धरित्या वळवली. याप्रकरणी लेखापरीक्षक शशिकांत सुखदेव थोरात यांनी मंगळवारी (दि. 8 एप्रिल) पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीनुसार, देशमुख यांच्याविरोधात फसवणूक व विश्वासघाताच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कारवाई सुरू आहे. दरम्यान, या प्रकारामुळे संस्थेतील सभासदांमधून संताप व्यक्त केला जात असून सहकारी संस्थांमधील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...