spot_img
ब्रेकिंगपुन्हा धक्कादायक घटना; अल्पवयीन पोराचं भयानक कृत्य, शहर हादरले, वाचा सविस्तर...

पुन्हा धक्कादायक घटना; अल्पवयीन पोराचं भयानक कृत्य, शहर हादरले, वाचा सविस्तर…

spot_img

Crime news: पुन्हा एक धक्कादायक घटना घडली असून शहराच्या कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चाकूचा धाक दाखवत अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. या प्रकरणात तौहिद समीर बैद (वय अंदाजे २२) या तरुणावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेला एकटे पाहून धमकावत चाकू दाखवला आणि तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीने घडलेली घटना घरी सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर बजरंग दलचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात जमा झाले होते.

त्यांनी आरोपीला त्वरित अटक करावी आणि कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी करत पोलिस प्रशासनाला घेराव घातला. या घटनेनंतर भाजप आमदार रणधीर सावरकर आणि काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी पोलिस ठाण्यात भेट देत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

दोन्ही आमदारांनी आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी करत संताप व्यक्त केला.पोलीस प्रशासनाने तत्काळ हालचाल करत आरोपीविरोधात पॉक्सो कायदा तसेच भारतीय दंड संहितेतील गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आरोपी अद्याप फरार असून, त्याच्या अटकेसाठी दोन विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

या घटनेमुळे अकोल्यातील डाबकी रोड परिसरातील नागरिकांमध्ये अस्वस्थता व भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, विशेषतः मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पालक आपल्या मुलींच्या सुरक्षेबाबत चिंताग्रस्त असून, शहरातील अनेक सामाजिक संघटनांनी निषेध व्यक्त करत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पक्षापेक्षा कोणीही मोठं नाही : आमदार दाते यांचे मोठे विधान

पारनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक; पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पारनेर / नगर सह्याद्री रविवार दिनांक ७...

कायनेटिक चौकातील परिसरातील नागरिकांना धोका?, माजी सभापती मनोज कोतकर मैदानात, नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री कायनेटिक चौक परिसरातील काही भागात गेल्या 1 महिन्यापासून दूषित पाणी...

सोशल मीडिया बंदीवरुन राडा, तरुणाई संसदेत घुसली, 5 आंदोलकांचा मृत्यू

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीवरून आक्रमक झालेल्या तरूणांनी सरकारविरोधात आंदोलन...

…अन्यथा दसरा मेळाव्यात पुढील भूमिका जाहीर करणार; जरांगे पाटलांचा सरकारला अल्टीमेटम, वाचा सविस्तर

जालना । नगर सहयाद्री:- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मनोज जरांगे...