spot_img
अहमदनगरपुन्हा एका मल्टिस्टेटच्या चेअरमनला अटक; 'इतक्या' कोटींचा गैरव्यवहार

पुन्हा एका मल्टिस्टेटच्या चेअरमनला अटक; ‘इतक्या’ कोटींचा गैरव्यवहार

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री:-
परळी पीपल्स मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या ११ कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संस्थेचा चेअरमन नितीन सुभाष घुगे (वय ३३ रा. टेलीफोन ऑफीससमोर, शेवगाव, हल्ली रा. एन.आर.आय.कॉम्पलेस, नवी मुंबई) याला नवी मुंबई येथून ताब्यात घेत अटक केली आहे. त्याला काल, रविवारी श्रीरामपूर येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने १ ऑटोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

परळी पीपल्सच्या वेगवेगळ्या शाखेमध्ये ठेवीदारांनी सुमारे ११ कोटींच्या ठेवी ठेवलेल्या आहेत. मात्र, त्या पैशांचा योग्य विनियोग न झाल्याने सोसायटी डबघाईला आली. परिणामी, ठेवीदारांना ठेवी परत मिळाल्या नाहीत. श्रीरामपूर शाखेत ठेवलेल्या ठेवी परत न मिळाल्यामुळे ठेवीदाराने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.

यापूर्वी विश्वजित राजेसाहेब ठोंबरे, प्रमोद खेेडकर, अमित गोडसे, मुख्य कार्यकारी अधिकारी निखीलेश मानुरकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या पथकाने घुगे याला नवी मुंबई येथून ताब्यात घेत अटक केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...