निघोज | नगर सह्याद्री
निघोज आणी परिसरातील कुत्रे, शेळ्या फस्त करणारा बिबट्या अखेर शिरसुले शिवारात रामचंद्र सखाराम घोगरे यांच्या घराजवळ बुधवारी पहाटे पिंजऱ्यात अडकला. गेली अनेक दिवसांपासून शिरसुले, लामखडे – वरखडे, शिवडी वस्तीवर बिबट्याने हैदोस घातला होता. शिरसुले येथील ग्रामस्थांनी वनविभागाकडे तक्रार करत पिंजरा लावण्याची मागणी केली होती.
सोमवार दि.22 व मंगळवार दि.23 रोजी पिंजरा लावला. यामध्ये एक शेळी ठेवण्यात आली. बुधवारी पहाटे शेळीच्या आशेने बिबट्या अलगद पिंजऱ्यात यापूर्वीही या परिसरातील बिबट्यांना जेरबंद करण्यात यश आले आहे.
निघोज आणी परिसरात बिबट्यांची संख्या जास्त असून या भागात उसाचे प्रमाण जास्त असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी जागा उपलब्ध होत आहे. यासाठी या भागात बहुतांश परिसरात पिंजरे देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.