मुंबई। नगर सहयाद्री-
आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून राज्याला पुढच्या ४८ तासांचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज नक्की घ्या. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात पावसाची जोरदार एन्ट्री होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान खात्याचा माहितीनुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे मागील काही दिवसांपासून देशातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. अशातच येत्या २६ मार्च रोजी वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
परिणामी हवामानात मोठा बदल होऊन येत्या ४८ तासांत वादळी वाऱ्यासह गारपीट देखील होऊ शकते, असं हवामान खात्याने सांगितलं असून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.